शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
2
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
3
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
4
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
5
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
7
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
9
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
10
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
11
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
12
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
13
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
14
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
15
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
17
दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी, भाजपचे नेते अनिल झा 'आप'मध्ये सामील
18
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या त्या टीकेमुळे शंभुराज देसाई संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर, म्हणाले...
19
"शरद पवारांना हिंदूंबद्दल बोलण्याची भीती वाटते?", व्होट जिहादवरुन किरीट सोमय्या संतापले
20
नात्याला काळीमा! ७ महिन्यांच्या गरोदर महिलेची सासरच्यांनी केली हत्या, २५ तुकडे अन्...

साखर-मसाले ६५ टक्के, तर अन्नधान्याची आवक ५५ टक्क्यांनी मंदावली; वाहतूकदारांचे देशव्यापी आंदोलन  

By नारायण जाधव | Published: January 02, 2024 7:17 PM

वाहतूकदार मंगळवारीही हिसंक होऊ नयेत यासाठी नवी मुंबईसह उरण-पनवेल परिसरात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.

नवी मुंबई: भारतीय न्यायिक संहितेतील हिट ॲण्ड रन प्रकरणात शिक्षेच्या तरतुदीविरोधात देशभरातील वाहनचालकांनी पुकारलेल्या आंदोलनाच्या मंगळवारी दुसऱ्या दिवशी येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाल्याच्या आवक-जावकवर फारसा परिणाम झाला नसला तरी अन्नधान्य आणि परराज्यातून येणारी आवक रोडावली आहे. मात्र, आवक थोडी कमी झाली तरी ग्राहकच कमी आल्याने भाजीपाल्याचे दर स्थिर होते. मात्र, हे आंदोलनच असे सुरू राहिल्यास येत्या-एक दोन दिवसांत अन्नधान्यासह भाजीपाल्याची आवक कमी होऊन दर वाढू शकतात, अशी भीती व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. मंगळवारी भाजीपाल्याची आवक १० टक्क्यांनी, फळांची २५ टक्के, कांदा-बटाटा २० टक्के तर अन्नधान्याची ५५ टक्के आणि साखर-मसाल्याची ६५ टक्के आवक कमी झाली आहे. एनएमएमटीचे वेळापत्रक कोलमडलेवाहतूकदारांच्या आंदाेलनामुळे पेट्रोल-डिझेलसह गॅसची वाहतूक मंदावल्याने त्याचा फटका मंगळवारी एनएमएमटी अर्थात नवी मुंंबई महापालिकेच्या परिवहन सेवेला बसला. यामुळे परिवहन सेवेचे वेळापत्रक काहीसे कोलमडल्याचे एनएमएमटीने सोशल मीडियाद्वारे जाहीर केले आहे. महामार्गांवर पोलिसांचा बंदोबस्तसोमवारप्रमाणेच वाहतूकदार मंगळवारीही हिसंक होऊ नयेत यासाठी नवी मुंबईसह उरण-पनवेल परिसरात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. शहरातून जाणारे सायन-पनवेल, ठाणे-बेलापूर, मुंबई-पुणे, जेएनपीटी ते पनवेल, मुंबई-गोवा आणि एक्स्प्रेस वे या सर्व महामार्गांवर पोलिस बंदोबस्तावर होते. अनेक ठिकाणी वाहतूकदारांनी आपली वाहने रस्त्याच्या कडेला उभी केलेली दिसली. महामार्गांवर अवजड वाहने कमी असल्याने नेहमीसारखी त्यांची वर्दळ नव्हती. आंदोलनापूर्वी आणि आंदोलनानंतरची आवक-आवक

  • मार्केट- आंदोलनापूर्वी - आंदोलनानंतर
  • कांदा-बटाटा-१६३- १३१
  • फळ - ३०२-२२८
  • भाजीपाला -५६३-५१६
  • साखर-मसाला-१६७-५९
  • अन्नधान्य -१४०-६४
  • एकूण - १३३५-९९८
टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई