शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
2
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
3
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
4
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
5
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
6
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
7
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
8
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
9
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
10
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
11
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
12
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
13
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
14
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
15
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
16
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
17
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
18
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
19
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
20
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले

अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न; कामाचा ताण की वरिष्ठांचा जाच? तर्कवितर्कांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2019 11:20 PM

कार्यालयीन कामाचा ताण वाढल्याने मागील काही महिन्यांपासून ते अस्वस्थ होते, त्यामुळे अनेकदा नोकरी सोडण्याचा विचारही त्यांनी आपले सहकारी व कुटुंबीयांकडे बोलून दाखविल्याचे समजते.

- कमलाकर कांबळे

नवी मुंबई : सिडकोच्या कार्मिक विभागात सहायक विकास अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या एका अधिकाºयाने बुधवारी आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मयूर अगवणे असे या अधिकाºयाचे नाव आहे. पत्नीच्या प्रसंगावधानाने त्यांचे प्राण वाचले. कार्यालयातील वरिष्ठ अधिकाºयांच्या त्रासाला कंटाळून मयूर यांनी हे पाऊल उचलल्याचे समजते. या घटनेची फारशी चर्चा झाली नसली तरी त्यामुळे सिडको कर्मचारीवर्गात मात्र खळबळ उडाली आहे.

राज्यातील सर्वात श्रीमंत महामंडळ म्हणून सिडकोची ओळख आहे; परंतु त्याचबरोबर भ्रष्टाचाराविषयी चर्चेतही सिडकोचा क्रमांक वरचा राहिला आहे. प्रत्येक विभागात फोफावलेल्या भ्रष्टाचारी मनोवृत्तीमुळे आपल्या हाताखालच्या कर्मचाºयांचे शोषण केले जात आहे. मागील अनेक वर्षांपासून हा प्रकार राजरोसपणे सुरू आहे; परंतु कोणी वाच्यता करायला धजावत नाही. मयूर अगवणे हे कार्मिक विभागात सहायक विकास अधिकारी म्हणून काम करीत आहेत.

कार्यालयीन कामाचा ताण वाढल्याने मागील काही महिन्यांपासून ते अस्वस्थ होते, त्यामुळे अनेकदा नोकरी सोडण्याचा विचारही त्यांनी आपले सहकारी व कुटुंबीयांकडे बोलून दाखविल्याचे समजते. याच मनस्थितीतून त्यांनी बुधवारी रात्री आपल्या घरातील बेडरूममध्ये गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. गळफास लावताना स्टुलचा आवाज आल्याने बाजूच्या रूममध्ये झोपलेल्या त्यांच्या पत्नीला जाग आली. त्यांनी तातडीने मयूर यांच्या खोलीकडे धाव घेतली. क्षणाचा विलंब न लावता त्यांनी पंख्याला अडकवलेली दोर कापून बेशुद्ध अवस्थेतील मयूर यांना खाली उतरविले. त्यानंतर त्यांना सीबीडी येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.

तीन दिवस त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार केल्यानंतर शनिवारी त्यांना घरी सोडून देण्यात आले. या प्रकरणी सीबीडी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

वरिष्ठांच्या छळाला कंटाळून मयूर यांनी हे पाऊल उचलल्याचे त्यांच्या पत्नीने पोलिसांना दिलेल्या जबानीत नमूद केले आहे. या घटनेचे तीव्र पडसाद सिडको वर्तुळात उमटले आहेत. हे प्रकरण चव्हाट्यावर येऊ नये, या दृष्टीने सिडकोच्या संबंधित विभागाकडून कसोशीने प्रयत्न सुरू असल्याचे समजते. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करून पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलीस उपायुक्त सुधाकर पठारे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.‘अर्थ’पूर्ण हित जपणाºयांवर वरिष्ठांचा वरदहस्तसिडकोच्या विविध विभागात अडंरटेबल संस्कृतीने जोम धरला आहे. अर्थपूर्ण हित जपणाºया अधिकारी व कर्मचाºयांवर वरिष्ठांचा वरदहस्त, अशी येथील एकूण परिस्थिती आहे. विशेषत: नियोजन विभाग, साडेबारा टक्के, भूमी व भूमापन आणि पणन विभागात हा प्रकार सर्रास चालतो.वरिष्ठांच्या मर्जीबाहेर जाणाºयांना सुट्टी नाकारणे, कोणत्याही वेळी आॅफिसमध्ये हजर राहण्यास सांगणे, केबिनच्या बाहेर तासन्तास उभे करून ठेवणे आदी प्रकारे त्रास दिला जातो. २०१२ मध्ये सिडकोचे वरिष्ठ अधिकारी जे. आर. कुलकर्णी यांचा तत्कालीन सह व्यवस्थापकीय संचालक तानाजी सत्रे यांच्या केबिनमध्ये हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला होता.या प्रकरणाचाही फारसा गाजावाजा झाला नाही. मयूर अगवणे यांचा आत्महत्येचा प्रयत्न हा याच अंकाचा भाग असल्याने या प्रकरणी सिडको व्यवस्थापन काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.नव्या दक्षता अधिकाºयांच्या भूमिकेवर लक्षसिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी म्हणून राज्य सरकारने पोलीस महासंचालक दर्जाचे निसार अहमद तांबोळी यांची नियुक्ती केली आहे. तांबोळी हे सोमवारी सिडकोत पदभार स्वीकारतील, असे बोलले जात आहे. त्यामुळे अगवणे यांच्या प्रकरणांत ते काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

संबंधित प्रकरणाची कोणतीही माहिती अद्याप आपल्याकडे आलेली नाही. अगवणे नामक अधिकाºयाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असेल, तर हा पोलीस तपासाचा भाग आहे. पोलिसांच्या चौकशीनंतर उपलब्ध माहितीच्या आधारे आवश्यक ती कारवाई केली जाईल.- लोकेश चंद्र,व्यवस्थापकीय संचालक, सिडको 

टॅग्स :cidcoसिडको