व्हॉटसअॅपवरील वादातून आत्महत्या
By admin | Published: January 21, 2016 02:39 AM2016-01-21T02:39:19+5:302016-01-21T02:39:19+5:30
आपल्या मैत्रिणीसोबत व्हाट्स अॅपवर वाद झाल्याने पृथ्वी पाटील या विद्यार्थ्याने नदीत उडी घेऊन जीवनयात्रा संपवली. कल्याण पश्चिमेकडील खडकपाडा परिसरातील राधानगर येथील
कल्याण : आपल्या मैत्रिणीसोबत व्हाट्स अॅपवर वाद झाल्याने पृथ्वी पाटील या विद्यार्थ्याने नदीत उडी घेऊन जीवनयात्रा संपवली.
कल्याण पश्चिमेकडील खडकपाडा परिसरातील राधानगर येथील पाच नंबर बिल्डिंग मध्ये राहणारा पृथ्वी हा बिएमएस चा विद्यार्थी आहे. रविवारी रात्री पृथ्वी त्याच्या मैत्रिणीसोबत व्हाट्स अॅपवर चॅटींग करत होता.याच दरम्यान या दोघांचा वाद झाला त्यानंतर रागाच्या त्याने मैत्रिणीला मेसेज पाठवले. त्यानंतर तो घराबाहेर निघून गेला. मात्र रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने त्याच्या कुटुंबियांनी त्याचा शोध घेण्यास सुरु वात केली. मात्र तो सापडला नाही. सोमवारी त्याची बाईक गांधारी नदीच्या इथे आढळून आली. गाडी आढळल्याने त्याने नदीत उडी मारून आत्महत्या केली असावी, असा संशय व्यक्त केला. मात्र त्याची बाईक लॉक असल्याने त्याने घाबरवण्यासाठी गाडी येथे ठेवून पळ काढला असेल असा अंदाज होता. पोलिसांनी अग्निशमन दलाला पाचारण करून नदीपात्रात शोध घेण्यास सुरुवात केली. तीन तास शोधाशोध केल्यानंतर त्याचा मृतदेह सापडला. खडकपाडा पोलिसांनी तो ताब्यात घेऊल शवविच्छेद्नसाठी पाठवला असून पुढील तपास चालू आहे, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरे यांना पत्रकारांना सांगितले.