मद्यपीची गळफास लावून आत्महत्या, व्यसनाधीनतेत कृत्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 02:53 AM2018-01-23T02:53:02+5:302018-01-23T02:53:12+5:30
घरात डांबून ठेवल्याने मद्यपीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. दारूच्या आहारी गेलेल्या पतीला व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी बंद घरात ठेवण्यात आले होते. मद्यपान करायला न मिळाल्याने त्याने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.
नवी मुंबई : घरात डांबून ठेवल्याने मद्यपीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. दारूच्या आहारी गेलेल्या पतीला व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी बंद घरात ठेवण्यात आले होते. मद्यपान करायला न मिळाल्याने त्याने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.
राहुल बजरंग गोडसे (३७) नेरुळ सेक्टर १० येथे पत्नी व लहान मुलीसह राहायला होते. पती-पत्नी दोघेही बँकेत कामाला आहेत, परंतु काही दिवसांपासून राहुल यांना दारूचे व्यसन लागले होते. नोकरीला जाण्याऐवजी ते मद्यपान करून परिसरात फिरायचे. त्यांच्या व्यसनामुळे कुटुंबाला मनस्ताप सहन करायला लागत होता. यामुळे त्यांना घरात डांबून पत्नी नोकरीला जायची. दरम्यान, शेजाºयांकडे घराची चावी देऊन त्यांच्यावर लक्ष ठेवले जायचे. सोमवारी सकाळी ११.३० च्या सुमारास त्यांना घरात डांबून ठेवले असता, त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले. सदर घटनेची नोंद नेरुळ पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे, तर व्यसनाच्या आहारी गेल्याने दारू प्यायला न मिळाल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज नेरुळ पोलिसांनी वर्तवला आहे.