काव्य लेखनात सुमय्या प्रथम
By admin | Published: May 2, 2017 03:01 AM2017-05-02T03:01:08+5:302017-05-02T03:01:08+5:30
अंजुमन इस्लाम कॉलेज आॅफ सायन्स व कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मुरुड यांच्या संयुक्त विद्यमाने कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी
नांदगाव/ मुरुड : अंजुमन इस्लाम कॉलेज आॅफ सायन्स व कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मुरुड यांच्या संयुक्त विद्यमाने कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी काव्य लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी या स्पर्धेत ३० विद्यार्थी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन चांगला प्रतिसाद दिला. या काव्य लेखन स्पर्धेत प्रथम क्र मांकाचे पारितोषिक सुमय्या रफिक मुकाबी या विद्यार्थिनीने पटकावले. द्वितीय क्रमांक ओंकार मिसाळ, तृतीय क्रमांक साजिया अस्लम वरवंडे, तर चतुर्थ क्रमांक सलवी भाऊ भोबू या विद्यार्थिनीस मिळाला.
या पारितोषिक वितरण समारंभास प्राचार्य शरद साहेबराव फुलारी, चेरमन सैयद जैनुद्दीन कादरी, मुरु ड तालुका कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष संजय गुंजाळ, अरु ण बागडे, डॉक्टर मधुकर वेदपाठक, उषा खोत आदींच्या हस्ते बक्षिसे वितरण करण्यात आली. या वेळी विजेत्यांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. या वेळी संजय गुंजाळ यांनी मराठी भाषेचे महत्त्व उर्दू विद्यार्थ्यांना कळावे यासाठीच ही स्पर्धा संयुक्त विद्यमाने घेण्यात आली होती.