नवी मुंबई : भारती विद्यापीठ व्यवस्थापकीय महाविद्यालयाच्या शिखर - २0१७ महोत्सवाला १६ फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. संस्थेच्या बेलापूर येथील इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट स्टडीज अॅण्ड रिसर्च शाखेच्या प्रांगणात १६ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत हा महोत्सव होणार आहे. यात नवी मुंबई, मुंबई, ठाणे आणि पनवेल येथील ५० हून अधिक महाविद्यालये सहभाग घेणार आहेत. ‘लोकमत’ हे या महोत्सवाचे माध्यम प्रायोजक आहे. अर्जुन पारितोषिक विजेत्या कबड्डीपटू अभिलाषा म्हात्रे यांच्या हस्ते सकाळी महोत्सवाची सुरुवात होणार आहे. सांस्कृतिक, क्रीडा व व्यवस्थापकीय अशा विविध शाखांशी निगडित स्पर्धांचा या महोत्सवात समावेश असणार आहे. मैदानी खेळात क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल, तर सांस्कृतिक कार्यक्र म होणार आहेत. द रॅम्प महोत्सवाचे आकर्षण आहे.
बेलापूरमध्ये शिखर-२0१७ महोत्सव
By admin | Published: February 15, 2017 4:58 AM