शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

बेलापूर टेकडीप्रकरणी मानवाधिकार आयोगाचे राज्य सरकार, सिडकोला समन्स

By नारायण जाधव | Published: May 07, 2024 6:59 PM

टेकडीवरील अनेक अनधिकृत बांधकामांवर आवश्यक ती कारवाई करण्यात अधिकाऱ्यांना अपयश आल्याने हे समन्स बजावले आहे.

नवी मुंबई : बेलापूर टेकडीला भूमाफियांपासून वाचविण्यासाठी पर्यावरणप्रेमींनी केलेल्या आंदोलनाच्या बातम्यांची स्वत:हून दखल घेऊन महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने गुरुवारी राज्याच्या मुख्य सचिवांसह सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक व अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांना हजर राहून या विषयावर स्पष्टीकरण देण्यास बोलावले आहे.

टेकडीवरील अनेक अनधिकृत बांधकामांवर आवश्यक ती कारवाई करण्यात अधिकाऱ्यांना अपयश आल्याने हे समन्स बजावले आहे.आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती के. के. तातेड आणि सदस्य एम. ए. सईद यांनी मुख्य सचिवांव्यतिरिक्त प्रधान सचिव, महसूल आणि वन विभाग, व्यवस्थापकीय संचालक, सिडको, आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी ठाणे यांनाही निर्देश दिले आहेत. हे अधिकारी न्यायालयात हजर न झाल्यास कायद्यानुसार या प्रकरणावर निर्णय घेईल, असे आयोगाने म्हटले आहे.

टेकडीवर अनेक अनधिकृत बांधकामे करून अनेक झाडे तोडल्याने पर्यावरणप्रेमींनी मानवी साखळी आंदोलन केले होते. याबाबत नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी. एन. कुमार यांनी लक्ष वेधले होते. आंदोलनानंतर सिडको सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप ढोले यांनी हे प्रकरण सिडकोकडे नसल्याचे सांगितले. तर, महापालिका आयुक्त कैलाश शिंदे यांनी या प्रकरणाची माहिती नसल्याचे सांगितले. ही जमीन सिडकोकडे हस्तांतरित केल्याचे वनविभागाने म्हटल्याचे कुमार म्हणाले. बेकायदा मंदिर असताना कल्पतरू सहकारी गृहनिर्माण संस्थेने सिडकोला कळवल्यानंतर गेल्या नऊ वर्षांपासून हा प्रश्न लटकत ठेवल्याचे संस्थेच्या कुलकर्णी यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनीही दिले होते निर्देशनेटकनेक्ट फाउंडेशनने दाखल केलेल्या तक्रारीवरून मुख्यमंत्र्यांनी प्रधान सचिव-नगरविकास यांना जमीन हडपाच्या रॅकेटचा शोध घेण्याचे निर्देश दिले आहेत. टेकडीच्या पायथ्याशी दोन ते तीन मंदिरांपासून सुरू झालेली बांधकामे आता उतारापर्यंत आणि अगदी टेकडीच्या माथ्यावर पसरली असल्याचे कुमार म्हणाले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई