नवी मुंबई : राज्यातील गेल्या विधानसभा निवडणुकच्या प्रचारादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांची साताऱ्यातील (Satara) भरपावसात झालेली सभा जबरदस्त गाजली होती. आता, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी त्या सभेतील पवारांच्या 'त्या' पावसात भाषण करतानाच्या फोटोचा किस्सा सांगितला आहे. त्या नवी मुंबई येथे कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होत्या. (Supriya Sule says how cameraman take shooting of NCP leader sharad pawar in satara rally)
सुप्रिया सुळे म्हणाल्या, “शरद पवारांची साताऱ्यातील सभा पावसात झाली आणि यशस्वी झाली. त्यावेळी तेथे माध्यमांचा एकही माणूस नव्हता. पाऊस झाल्याने सभा होणार नाही, ती रद्द होईल, या विचाराने सर्वच पत्रकार मंडळी निघून गेले होते. तेथे केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या मीडिया सेलचाच व्यक्ती उपस्थित होता. त्याने शशिकांत शिंदे यांना फोन लावला आणि सभा होणार आहे की नाही, अशी विचारणा केली. यावर शशिकांत यांनी सभा होणार असल्याचे सांगितले. यावर पुन्हा तो म्हणाला, माझा कॅमेरा दीड लाख रुपयांचा आहे. पावसात खराब झाला तर तुम्हाला द्यावा लागेल. यानंतर शशिकांत यांनी त्या कॅमेरामनला कॅमेरा भरून देण्याचं आश्वासन दिलं आणि शुटिंग करायला सांगितली. यानंतर, त्या कॅमेरामनला देशातल्या टर्निंग पॉईंटचा फोटो मिळाला." एवढेच नाही, तर नियतीच्या मनात काय असते ते कुणालाही माहिती नसते. त्यामुळे एखाद्या चांगल्या कारणासाठी तुम्ही लढलात तर त्याचा परिणाम चांगलाच होतो,” असेही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.
शिवजयंतीच्या कार्यक्रमात रोहित पवारांनी भर पावसात केले भाषण, उपस्थितांना आली शरद पवारांची आठवण नवी मुंबईत 1 हजार 1 टक्के सत्ता परिवर्तन - छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी नवी मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत सुप्रिया सुळे यांनी अभिवादन केले. यावेळी नवी मुंबईत सत्ता परिवर्तन 1 हजार 1 टक्के होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
....अन् सुप्रिया सुळेंचा पारा चढला; शरद पवारांवर टीका करणाऱ्या नरेंद्र मोदींना करून दिली जुनी आठवण