सुरेश कुलकर्णी स्थायी समिती सभापती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 06:56 AM2018-05-11T06:56:29+5:302018-05-11T06:56:29+5:30
स्थायी समिती सभापतीपदी राष्ट्रवादी काँगे्रसच्या सुरेश शिवाजी कुलकर्णी यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी शिवसेना उमेदवार दीपाली संकपाळ यांचा तीन मतांनी पराभव केला.
नवी मुंबई - स्थायी समिती सभापतीपदी राष्ट्रवादी काँगे्रसच्या सुरेश शिवाजी कुलकर्णी यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी शिवसेना उमेदवार दीपाली संकपाळ यांचा तीन मतांनी पराभव केला.
महापालिकेची तिजोरी समजल्या जाणाऱ्या स्थायी समितीवर कोणाची वर्णी लागणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये माजी उपमहापौर अशोक गावडे, माजी सभापती व पक्षप्रतोद डॉ. जयाजी नाथ हेही स्पर्धेत होते. परंतु पक्ष नेतृत्वाने अनेकांच्या नाराजीकडे दुर्लक्ष करून सुरेश कुलकर्णी यांना उमेदवारी दिली होती. गुरुवारी मनपा मुख्यालयात यासाठी निवड प्रक्रिया राबविण्यात आली. पीठासन अधिकारी म्हणून मुंबई शहरचे जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी काम पाहिले. शिवसेनेच्या दीपाली सुरेश संकपाळ यांना ६ मते पडली. राष्ट्रवादीच्या सुरेश कुलकर्णी यांना ९ मते मिळाली.
स्थायी समितीचे सभापतीपद तिसºयांदा मिळविण्यात सुरेश कुलकर्णी यशस्वी झाले आहेत. पक्षाचे नेते गणेश नाईक व सर्वांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरवून चांगली कामगिरी करून दाखविणार असल्याचे त्यांनी नियुक्तीनंतर स्पष्ट केले.
महापौर जयवंत सुतार, आमदार संदीप नाईक, उपमहापौर मंदाकिनी रमाकांत म्हात्रे, आयुक्त रामास्वामी एन, सभागृह नेते रवींद्र इथापे, विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी कुलकर्णी यांचे अभिनंदन केले.