नवी मुंबई : कोणत्याही परिस्थितीत डिसेंबर २०२४ पर्यंत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमानोड्डाण करण्याचा संकल्प राज्य सरकारने केला आहे. त्यादृष्टीने सिडको आणि विकास कंपनी अदानी समूहाने युद्धपातळीवर कामे सुरू केली आहेत. याच दृष्टीने विमानतळावर ये-जा करणाऱ्या सर्व प्रकारच्या विमानांच्या संचालनासाठी अत्यावश्यक असलेली रडार यंत्रणा बसविण्यासाठी आता हालचाली सुरू केल्या आहेत.
नवी मुंबईतील बेलापूरनजीकच्या शहाबाज येथील धाकले आयलंडवर जून २०२४ पर्यंत ही रडार यंत्रणा बसविण्यात येणार आहे. ती बसविण्यासाठी सीआरझेड प्राधिकरणाने हिरवा कंदिल असून याबाबतचा प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालयाकडे पाठविला आहे.
जून २०२४ ची डेडलाइनभारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या देखरेखीखाली ही कामे केली जाणार आहेत. विमानतळ प्राधिकरणाच्या अंदाजानुसार नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर येथे प्रवासी प्रतिवर्षी ६० दशलक्ष प्रवासी ये-जा करतील, असा अंदाज आहे. त्यानुसार विमानांचे किमान ३ नॉटिकल मैलावर उच्च तीव्रतेच्या धावपट्टीच्या ऑपरेशनसाठी रडार यंत्रणा बसविण्याची योजना आहे. यासाठी प्राधिकरणाने विमानांच्या चोख संचालनासाठी किमान ३ विमानतळ सर्वेक्षण रडार प्रणाली बसविण्यासाठी योजना आखली आहे. त्यापैकी पहिले रडार जून २०२४ पर्यंत बसविण्यात येणार आहे. जेणे करून त्याची तपासणी आणि चाचणी करून डिसेंबर २०२४ पासून येथून येजा करणाऱ्या सर्वप्रकारच्या विमानांचे निरीक्षण करता येणे सोपे होईल.
धाकले आयलंडचीच जागा काधाकले आयलंड हे आयलंड पनवेल खाडीने वेढलेले आहे. बेलापूरची महागाव जेट्टी आणि सीवूड टर्मिनल येथून जवळच असून, येथून सहज ये-जा करता येणार आहे. परिसरात कोणतीही मानवी वस्ती आणि विकासकामे सुरू नाहीत. रडार यंत्रणा बसविण्यासाठी ०.५३१५ हेक्टर खारफुटीसह ६० झाडांची कत्तल करावी लागणार आहे.ही कामे करणाररडारसाठी लागणारी जागा - ५० बाय ५० मीटर अर्थात ०.५० हेक्टर..जेट्टी - ४५ मीटर बाय १५ मीटरजेट्टीला जोडणारा रस्ता - १२१ मीटर बाय ८ मीटरजेट्टीचा अंतर्गत रस्ता : २७ बाय आठ मीटरयाशिवाय मलाबार शिपयार्डपर्यंत हे आयलंड रस्त्याने जोडण्यात येणार आहे.