पनवेल महापालिकेतील गावठाणांचा सर्व्हे; भूमी अभिलेख विभागाचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 01:16 AM2018-04-20T01:16:44+5:302018-04-20T01:16:44+5:30

पनवेल महापालिकेतील गावठाणांचा लवकरच सर्व्हे केला जाणार आहे. भूमी व अभिलेख विभागाने यासंबंधीचा प्रस्ताव तयार केला असून, २० एप्रिल रोजी मंजुरीसाठी तो महासभेत मांडला जाणार आहे.

Survey of Gaavthan in Panvel Municipal Corporation; Proposal of land records department | पनवेल महापालिकेतील गावठाणांचा सर्व्हे; भूमी अभिलेख विभागाचा प्रस्ताव

पनवेल महापालिकेतील गावठाणांचा सर्व्हे; भूमी अभिलेख विभागाचा प्रस्ताव

Next

- वैभव गायकर

पनवेल : पनवेल महापालिकेतील गावठाणांचा लवकरच सर्व्हे केला जाणार आहे. भूमी व अभिलेख विभागाने यासंबंधीचा प्रस्ताव तयार केला असून, २० एप्रिल रोजी मंजुरीसाठी तो महासभेत मांडला जाणार आहे. या कामासाठी एक कोटी ९० लाख रुपयांचा खर्च निर्धारित करण्यात आला आहे.
पनवेल महानगरपालिकेत २९ महसुली गावांचा समावेश आहे. गावांची हद्द निश्चित नसल्याने सिडको व महापालिकेत हद्दीवरून वाद निर्माण होत आहेत.
सध्या ग्रामीण भागात कोणत्याही विकासासाठी महापालिकेकडून परवानगी मिळत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील रहिवासी त्रस्त झाले आहेत. राज्य सरकारने सिडकोच्या माध्यमातून पनवेल, ठाणे आणि उरण तालुक्यातील जमिनी संपादित
केल्या. जमिनी संपादित करून ४० वर्षांचा काळ उलटला, तरी सिडकोने सिटी सर्व्हे केला नाही, त्यामुळे
हद्दीचा वाद निर्माण झाला
आहे.
गरजेपोटीच्या बांधकामांचा प्रश्न बिकट झाला आहे. गावठाणांचा सिटी सर्व्हे न झाल्याने गरजेपोटीची बांधकामे सिडकोने अनधिकृत ठरविली आहेत; परंतु आता महापालिकेनेच गावठाणांचा सिटी सर्व्हे करण्याचा निर्णय घेतल्याने ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळणार आहे.
भूमी व अभिलेख विभागाने त्यासाठी तयार केलेल्या प्रस्तावात
एक कोटी ९० लाख रुपयांचा
खर्च अपेक्षित धरला आहे.
या प्रस्तावाला सर्वसाधारण सभेची मंजुरी मिळाल्यानंतर त्यावर प्रत्यक्ष कार्यवाही सुरू होणार आहे. गावठाणातील सिटी सर्व्हे करण्यासंदर्भात समाजसेवक
प्रभाकर जोशी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयापासून, आमदार,
महापौर, तसेच भूमी अभिलेख विभागाशी पत्रव्यवहार केला
होता.

- पनवेल महानगरपालिकेत समाविष्ट २९ गावांपैकी तळोजे पाचनंद, काळुंद्रे, खारघर, ओवे, कामोठे, नावडे, तोंडरे, पेंधर या गावांचे गावठाण भूमापन होऊन या गावांचे अधिकार अभिलेख नकाशे तयार करण्यात आलेले आहेत. उर्वरित महापालिका हद्दीतील १५,८३४ मिळकतीचा सर्व्हे केला जाणार आहे.

गावठाणातील सिटी सर्व्हे करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयापासून आमदार, महापौर, तसेच भूमी अभिलेख विभागाशी पत्रव्यवहार केला होता. या पाठपुराव्याला यश आले आहे. गावठाणांचा सर्व्हे झाल्यानंतर गावठाणातील गावांच्या विकासाची वाट मोकळी होणार आहे.
- प्रभाकर जोशी,
समाजसेवक, खारघर

Web Title: Survey of Gaavthan in Panvel Municipal Corporation; Proposal of land records department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :panvelपनवेल