निलंबित ठेकदारांवर मेहरनजर? पनवेल महापालिकेतील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 06:59 AM2018-05-27T06:59:35+5:302018-05-27T06:59:35+5:30

कामगारांचे आर्थिक शोषण केल्याचा ठपका ठेवत ठेका रद्द करण्यात आलेल्या मनुष्यबळ पुरवठा करणाऱ्या श्री कॉम्प्युटर्स या ठेकेदाराचे काम अद्यापि सुरूच असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

 Suspended contract owner? Type of Panvel Municipal Corporation | निलंबित ठेकदारांवर मेहरनजर? पनवेल महापालिकेतील प्रकार

निलंबित ठेकदारांवर मेहरनजर? पनवेल महापालिकेतील प्रकार

Next

- वैभव गायकर
पनवेल  - कामगारांचे आर्थिक शोषण केल्याचा ठपका ठेवत ठेका रद्द करण्यात आलेल्या मनुष्यबळ पुरवठा करणाऱ्या श्री कॉम्प्युटर्स या ठेकेदाराचे काम अद्यापि सुरूच असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महासभेने ठेका रद्द करण्याचा निर्णय घेऊनही प्रशासनाने संबंधित ठेकेदारावर मेहरनजर दाखवित मागील सात महिन्यांत लाखो रुपयांची देयके अदा केल्याचे समोर आले आहे. या प्रकाराची महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी गंभीर दखल घेतली असून सखोल चौकशी करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले आहेत. संबंधित ठेकेदारांच्या विरोधातील वाढत्या तक्रारींची दखल घेत नोव्हेंबर २0१७मध्ये झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत महापौर डॉ. कविता चौतमल यांनी कंत्राट रद्द करण्याचे आदेश दिले होते. परंतु सात महिने उलटले तरी सदर कंत्राटदाराने आपले काम थांबविले नसल्याचे दिसून आले आहे. मागील सात वर्षांपासून संबंधित ठेकेदार पालिकेत कार्यरत आहे. नगर परिषदेचे रूपांतर पनवेल महानगरपालिकेत झाल्यानंतरदेखील हाच कंत्राटदार महापालिकेला डेटा एंट्री आॅपरेटर पुरवत आहे. विशेष म्हणजे तत्कालीन नगर परिषदेने केलेल्या ठरावाच्या बळावर अद्यापि हा ठेका सुरू आहे. संबंधित कंत्राटदाराने पालिकेच्या कंत्राटी कामगारांच्या सह्या घेऊन ५ हजार रुपये जीएसटीपोटी कपात केल्याचा प्रकार यापूर्वी उघडकीस आला होता. विशेष म्हणजे खुद्द सभागृह नेते परेश ठाकूर यांनीच यासंदर्भात खुलासा केला होता. श्री कॉम्पुटर्सला पालिकेत मनुष्यबळ पुरविण्याचा ठेका मिळाला आहे. त्याच्यामार्फत ८0 कर्मचारी पुरविलेत. या कामगारांना केवळ ११00 रुपये वेतन दिले जात आहे. हे वेतनही वेळेवर होत नसल्याचे कामगारांचे म्हणणे आहे.

पत्नीच्या नावाने वेतन
श्री कम्पुटर्सचे ठेकेदार आदेश नाईक यांच्या मार्फत पालिकेत मनुष्यबळ पुरविले जाते. या यादीत ठेकेदारांच्या पत्नीचेदेखील नाव आहे. मागील अनेक महिन्यांपासून माधुरी आदेश नाईक यांच्या नावाने पालिकेच्या मार्फत वेतन दिले जात आहे. महापालिकेमार्फत मंत्रालयात सदर कर्मचारी कार्यरत असल्याचे ठेकेदाराचे म्हणणे आहे. मात्र पालिकेला मंत्रालयात कर्मचारी नेमण्याची गरज काय पडली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

कार्यरत नसतानाही बायोमेट्रिक हजेरी
महापालिकेत कार्यरत नसतानादेखील संबंधित कर्मचाºयाची बायोमेट्रिक हजेरी लागलीच कशी, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे संबंधित कर्मचारी पालिकेत अनेक महिन्यांपासून कार्यरत असतानाही त्याची माहिती कोणालाच नाही, याबाबतही संभ्रम निर्माण झाला आहे.

आयुक्तांनी घेतली गंभीर दखल
संबंधित कंत्राटदारामार्फत स्वत:च्या पत्नीच्या नावाने मागील अनेक महिन्यांपासून वेतन काढले जात असल्याच्या प्रकाराची महापालिका आयुक्त देशमुख यांनी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावली असून सखोल चौकशी करण्याचे आदेश दिल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

सध्याच्या घडीला कोंकण पदवीधर संघाची आचारसंहिता लागू असल्याने महापालिकेला लगेच नवीन कंत्राटदाची नियुक्ती करता येणार नाही. असे असले तरी पुढील महिनाभरात निविदा काढून नवीन कंत्राटदाराची नेमणूक केली जाईल.
- गणेश देशमुख,
आयुक्त, पनवेल महापालिका

Web Title:  Suspended contract owner? Type of Panvel Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.