महासभेत माईक हिसकावणा-या नगरसेवकाचे पंधरा दिवसांसाठी निलंबन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 03:01 AM2017-12-13T03:01:56+5:302017-12-13T03:02:32+5:30

पनवेल महानगरपालिकेच्या विशेष सभेत नगरसचिवांच्या हातातील माईक खेचून सभागृहाचा अवमान करणारे शेकाप नगरसेवक अजीज मोहसीन पटेल यांना १५ दिवसांकरिता निलंबित करण्यात आले आहे.

Suspension for fifteen days for corporalist Mike snatching in the General Assembly | महासभेत माईक हिसकावणा-या नगरसेवकाचे पंधरा दिवसांसाठी निलंबन

महासभेत माईक हिसकावणा-या नगरसेवकाचे पंधरा दिवसांसाठी निलंबन

Next

पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या विशेष सभेत नगरसचिवांच्या हातातील माईक खेचून सभागृहाचा अवमान करणारे शेकाप नगरसेवक अजीज मोहसीन पटेल यांना १५ दिवसांकरिता निलंबित करण्यात आले आहे. याबाबत महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी महासभेतील गैरशिस्तीबाबत महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमान्वये अजीज पटेल यांच्यावर कारवाई केली आहे.
यासंदर्भात महापौर डॉ. चौतमोल यांनी पटेल यांना जारी केलेल्या पत्रात नमूद केले आहे की, ७ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता पनवेल महानगरपालिकेच्या आद्यक्र ांतिवीर वासुदेव बळवंत फडके सभागृहामध्ये महापालिका हद्दीतील विविध विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी विशेष सभा बोलाविण्यात आली होती. या सभेमध्ये पटलावरील विषय क्र मांक २ महापालिका हद्दीतील सर्व विभागांचा कचरा उचलण्यास विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून ई-निविदा प्रसिद्ध करून ठेकेदार नियुक्त करण्याबाबत व महापालिका क्षेत्रातील सिडकोच्या अखत्यारीतील असलेल्या सेवा पनवेल महापालिकाकडे हस्तांतरित करण्याबाबत चर्चा करून निर्णय घेणे यावर सभागृहामध्ये चर्चा सुरू होती. त्या वेळी मोठ्या प्रमाणावर गोंधळसदृश परिस्थिती निर्माण झाल्यामुळे व या प्रस्तावावर सभागृहामध्ये एकमत होत नसल्याने हा प्रस्ताव मतास टाकण्यात आला. यासाठी मतदान प्रक्रि या सुरू करण्याचे आदेश पीठासन अधिकारी या नात्याने मी नगरसचिवांना दिले. यानंतर नगरसचिवांमार्फत या प्रस्तावावर मतदान प्रक्रि या सुरू असताना आपण अचानक व्यासपीठावर धावत येऊन नगरसचिवांच्या हातातील माईक खेचून घेऊन गेलात.
लोकशाही पद्धतीने सुरू असलेली कायदेशीर मतदानप्रक्रि या बंद पाडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आपणास वारंवार सभागृहाच्या बाहेर जाण्याचे आदेश देऊनही आपण सभागृह सोडले नाही व आपल्या वर्तनात सुधारणा झाली नाही. आपले हे वर्तन महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदींना बाधा पोहोचविणारे असून, सभाशास्त्रातील नियमांना धरून नाही, तसेच सभागृहाची प्रतिमा जनमानसात मलिन करणारे आहे.
सर्व बाबींचा विचार करून महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील प्रकरण २ मधील कलम २(२) अन्वये मला प्राप्त अधिकारानुसार पनवेल महापालिकेचे सदस्य अजीज मोहसीन पटेल यांना ७ डिसेंबरपासून पुढील १५ दिवसांकरिता महापालिकेच्या सभांना उपस्थित राहण्यापासून निलंबित करीत आहोत. ७ डिसेंबरपासून पुढील १५ दिवसांच्या कालावधीत होणाºया म्हणजेच १८ डिसेंबरच्या महासभेस आपण उपस्थित राहू नये. उपरोक्त आदेशांचे पालन करण्यात यावे, असे डॉ. चौतमोल यांनी कारवाई पत्रात स्पष्ट केले आहे.

या निर्णयाचा आम्ही निषेध करीत आहोत. नागरिकांच्या महत्त्वाच्या प्रश्नावर सभागृहात बोलत असताना आमचे माईक बंद केले. त्यामुळेच चालू असलेला माईक आमच्या नगरसेवकाने सचिवाकडून घेतला. सत्ताधारी मनमानी करीत आहेत. म्हणून हा निर्णय त्यांनी घेतला आहे.
- प्रीतम म्हात्रे,
विरोधी पक्षनेते,पनवेल महानगरपालिका

Web Title: Suspension for fifteen days for corporalist Mike snatching in the General Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :panvelपनवेल