पनवेल : खारघर सेक्टर १० मधील शेल्टर बिल्डिंगमध्ये मागील दोन वर्षांपासून सुरू असलेल्या अनधिकृत मशिदीच्या बांधकामावर मंगळवारी सिडकोच्यावतीने कारवाई करण्यात येणार होती; परंतु ऐनवेळी ही कारवाई स्थगित करण्यात आली आहे.
खारघर सेक्टर १० मध्ये शेल्टर रहिवासी संकुलात तळमजल्यावर अनधिकृतपणे बांधकाम करण्यात आले आहे. यासंदर्भात स्थानिकांनी सिडको, खारघर पोलीस यांच्याकडे कारवाई करण्यासाठी पत्रव्यवहार केले आहेत. मात्र, विविध कारणे दाखवून सिडको प्रशासन कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे. मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास शेकडो पोलिसांचा फौजफाटा, जेसीबी घेऊन कारवाई करण्यासाठी आलेले अधिकारी पुन्हा एकदा कोणतीही कारवाई न करता परत गेल्याने रहिवाशांनी सिडकोच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त केली. या वेळी खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप तिदार, अतिक्र मण नियंत्रण विभागाचे विशाल ढगे हे देखील उपस्थित होते. या संदर्भात सिडकोचे वसाहत अधिकारी दत्तात्रेय चौरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.