शहरं
Join us  
Trending Stories
1
उपमुख्यमंत्रिपद, पक्षाचं प्रमुखपद की केंद्रीय राजकारण...; एकनाथ शिंदेंचं पुढचं पाऊल काय?
2
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
3
महायुती सरकारने वक्फ बोर्डाला १० कोटी निधी केला जाहीर; सरकारी जीआर जारी
4
मुख्यमंत्रि‍पदाचा निर्णय झाला का? बैठकीनंतर एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती
5
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
6
मशालीमुळे उडाला भडका, आगीचे लोळ उठले, ३० जण होरपळले  
7
देशात सर्वाधिक टोल वसुली कुठल्या राज्यात होते? २४ वर्षात सरकारने किती कमाई केली? गडकरींनी दिली माहिती
8
Stock Market Updates: शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २०० अंकांनी वधारला लाइफ इन्शुरन्स शेअर्स वधारले
9
१५० व्या कसोटीत Joe Root वर ओढावली नामुष्की! WTC मध्ये विराटपेक्षा अधिक वेळा पदरी पडला भोपळा
10
शेख हसीना चिन्मय कृष्ण दास यांच्या समर्थनात उतरल्या; तात्काळ सुटकेची मागणी केली
11
'ट्रम्प परत येताहेत'; बांगलादेशातील हिंदुवरील हल्ल्यांवर मूर यांचे विधान
12
अस्थिर बाजारात गुंतवणूकीची भीती वाटतेय? 'या' ५ पर्यायांचा विचार करा; टेन्शनशिवाय मिळेल प्रॉफिट
13
मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात शिंदेंनी गृहमंत्रालयासह एवढ्या मंत्रिपदांची केली मागणी, भाजपाकडून असा प्रतिसाद
14
१ डिसेंबरपासून ५ मोठे बदल होणार; सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होणार, वाचा सविस्तर
15
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?
16
Tata Sons वर गंभीर आरोप, RBI ला कायदेशीर नोटीस... काय आहे संपूर्ण प्रकरण?
17
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
18
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
19
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित

चारित्र्याचा संशय : बार व्यावसायिकाकडून पत्नीची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 2:30 AM

चारित्र्याच्या संशयावरून बार व्यावसायिकाने पत्नीची हत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी कोपरखैरणेत घडली. हत्येनंतर त्याने स्वत: एका व्यक्तीमार्फत पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली

नवी मुंबई : चारित्र्याच्या संशयावरून बार व्यावसायिकाने पत्नीची हत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी कोपरखैरणेत घडली. हत्येनंतर त्याने स्वत: एका व्यक्तीमार्फत पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती.रेखा गौडा (३३) असे मयत महिलेचे नाव असून ती कोपरखैरणे सेक्टर १२ ए येथील लक्ष्मी नारायण कॉम्प्लेक्समध्ये पती व दोन मुलांसह रहायला होती. तिचा पती धर्मा गौडा (४५) हा बार व्यावसायिक असून त्याची शहरातील तीन बारमध्ये भागीदारी आहे. मागील काही दिवसांपासून त्याचा पत्नीच्या वागणुकीवर संशय होता. यावरून त्यांच्यात सतत वाद सुरू होते. याच कारणातून मंगळवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास धर्मा याने पत्नी रेखाच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून तिची हत्या केली. यावेळी त्यांचा दहा वर्षांचा मुलगा शाळेत गेलेला होता, तर चार वर्षांची मुलगी बेडरुममध्ये झोपलेली होती. पत्नीच्या हत्येनंतर त्याने घटनास्थळावरून पळ काढल्यानंतर घरात पत्नीचा मृतदेह असल्याची माहिती एका व्यक्तीला दिली. सदर व्यक्तीने ही बाब कोपरखैरणे पोलिसांना कळवली असता, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी घरात रेखाचा मृतदेह पडल्याचे आढळून आले. गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकामार्फत घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेवून तो शवविच्छेदनासाठी पालिका रुग्णालयात पाठवला आहे. सहायक आयुक्त प्रदीप जाधव यांच्यासह वरिष्ठ निरीक्षक शिवाजी आवटे यांनीही घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. याप्रकरणी धर्मा गौडा याला ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.