खारघरमध्ये कावळ्यांचा संशयास्पद मृत्यू ;नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2021 04:16 PM2021-01-11T16:16:44+5:302021-01-11T16:20:22+5:30

खारघर सेक्टर १९  मध्ये दोन कावळ्यांचा संशयास्पद मृत्यु झाल्याने खळबळ उडाली आहे.दि. ७ रोजी येथील पोलीस संमिश्र सोसायटी च्या कंपाऊंड मध्ये एक कावळा मृत पावल्याची बाब या परिसरातील रहिवाशांच्या निदर्शनास आली.

Suspicious death of crows in Kharghar; Fear among citizens | खारघरमध्ये कावळ्यांचा संशयास्पद मृत्यू ;नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

खारघरमध्ये कावळ्यांचा संशयास्पद मृत्यू ;नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Next

- वैभव गायकर
पनवेल - खारघर सेक्टर १९  मध्ये दोन कावळ्यांचा संशयास्पद मृत्यु झाल्याने खळबळ उडाली आहे.दि. ७ रोजी येथील पोलीस संमिश्र सोसायटी च्या कंपाऊंड मध्ये एक कावळा मृत पावल्याची बाब या परिसरातील रहिवाशांच्या निदर्शनास आली.दोन दिवसात दुसरा कावळा देखील याठिकाणी मृत पावल्याने यासंदर्भात पालिकेकडे लेखी तक्रार केली आहे.

सेक्टर १९ मधील रहिवासी व भाजपच्या खारघर तळोजा मंडळच्या उपाध्यक्ष बिना गोगरी यांनी यासंदर्भात पालिकेकडे तक्रार केली आहे.विशेष म्हणजे सध्याच्या घडीला बर्ड फ्लूचा धोका वाढत चालला आहे. कावळ्यांमध्ये देखील बर्ड फ्लूची लक्षणे आढळल्याची घटना घडल्या असल्याने गोगरी यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता मृत कावळ्यांची वैद्यकीय तपासणी करण्याची मागणी पालिकेकडे केली आहे.सेक्टर १९ मधील परिसरात दोन व खारघर सेक्टर 4 बेलपाडा व खारघर रेल्वे स्थानक परिसरात अशाच प्रकारे संशयास्पद पक्षी मृत अवस्थेत सापडल्याचे खारघर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच संजय घरत यांनी सांगितले.मात्र या घटनेचे गांभीर्य पालिका अधिकाऱ्यांनी घेतलेले दिसून येत नाही.पनवेल महानगरपालिकेचे प्रभाग अ चे अधिकारी दशरथ भंडारी यांना यासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी संबंधित पशु वैद्यकीय विभागाच्या अखत्यारीत येत असल्याचे सांगितले.पालिका अधिकाऱ्यांनी या घटनेची दखल घेऊन त्वरित मृत पक्षाचे अवशेष वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्याची गरज असल्याचे बिना गोगरी यांनी सांगितले.

 पनवेल महानगरपालिकेचे प्रभाग अ चे अधिकारी दशरथ भंडारी यांना यासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी संबंधित पशु वैद्यकीय विभागाच्या अखत्यारीत येत असल्याचे सांगितले.


 

Web Title: Suspicious death of crows in Kharghar; Fear among citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.