पनवेल : कोविडसारख्या महाभयंकर संसर्गजन्य आजारात आपले काम प्रामाणिकपणे करणाऱ्या सफाई कामगारांकडे सिडको प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. अशा परिस्थितीत अनेक सफाई कामगारांना कोविडने ग्रासले असून, एका कर्मचाºयाचा मृत्यूही कोविडने झाला आहे. कामगारांच्या विविध मागण्यांसंदर्भात आझाद कामगार संघटनेच्या माध्यमातून सोमवारी सीबीडी बेलापूर येथील सिडको भवनात कामगारांनी ठिय्या आंदोलन केले.सिडकोकडून सफाई कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत आहे. याची तातडीने दखल घ्यावी, यासाठी सर्व सफाई कामगारांनी आझाद कामगार संघटनेचे अध्यक्ष महादेव वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली सिडको भावनावर मोर्चा काढत कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच ठिय्या आंदोलन केले. सिडकोच्या माध्यमातून विविध आस्थापनांमध्ये ६५० सफाई कामगार कार्यरत आहेत. यामध्ये नवी मुंबईमधील रेल्वे स्टेशन ३२४, सिडकोची सर्व कार्यालये २००, उलवे, द्रोणागिरी, करंजाडे नोड १३५, तसेच औषध फवारणीसाठी २५ असे एकूण ६५० सफाई कामगार कार्यरत आहेत. यामध्ये महिलांची संख्याही मोठी आहे. कोविड काळात जीव धोक्यात घालून काम करणाºया सिडकोच्या सफाई कामगारांना कोविडचा पन्नास लाख रुपये विमा जाहीर करावा, कोविड भत्ता द्यावा, कोरोना संसर्गजन्य रोगाची योग्य ती सुरक्षा साहित्य पुरवावा, खांदेश्वर रेल्वे स्टेशनचा सफाई कामगार निवृत्ती म्हात्रे यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, त्यांच्या कुटुंबाला सिडकोने तातडीने ५० लाख रुपये द्यावे, चालू वर्षाच्या दोन जोडी गणवेश देण्यात यावे, या मागण्यासाठी ठिय्या आंदोलन करण्यात आले.मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचारहजारो कोटी रुपयांची कामे करणारे सिडको महामंडळ शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याची जबाबदारी पार पडणाºया खºया कोविड यौद्ध्यांबाबत दुजाभाव करीत असल्याने कामगारांनी सिडको विरोधात हे आंदोलन पुकारले असल्याचे वाघमारे यांनी सांगितले.बेलापूर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी मध्यस्थी करून सिडको अधिकारी आणि आझाद कामगार संघटनेची बैठक घडवून आणली. कामगारांच्या मागण्यांसंदर्भात आम्ही सहानुभूतीपूर्वक विचार करणार आहोत.सिडको महामंडळाच्या पॉलिसीमध्ये बसणाºया मागण्या आम्ही निश्चितच पूर्ण करू, असे यावेळी रेल्वे प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता सुधाकर विसाळे यांनी सांगितले. यावेळी सिडकोचे मुख्य सिडकोचे आरोग्य अधिकारी डॉ. बी.एस. बाविस्कर, रेल्वे प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता सुधाकर विसाळे, आझाद कामगार संघटनेचे महादेव वाघमारे आदींसह सिडको अधिकारी व सफाई कामगारांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
सफाई कामगारांचा सिडको भवनावर ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2020 12:10 AM