पनवेलमधील प्रबळगडावर आढळली शिवराई नाणी

By admin | Published: February 10, 2017 04:18 AM2017-02-10T04:18:12+5:302017-02-10T04:18:12+5:30

स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडमध्ये आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक आठवणी जिवंत असल्याचे दिसून येत आहे

Swivel coins found at Prabalgad in Panvel | पनवेलमधील प्रबळगडावर आढळली शिवराई नाणी

पनवेलमधील प्रबळगडावर आढळली शिवराई नाणी

Next

वैभव गायकर , पनवेल
स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडमध्ये आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक आठवणी जिवंत असल्याचे दिसून येत आहे. पनवेलमधील प्रबळगडावर सापडलेली नाणी हे याचेच साक्षीदार आहेत. किल्ल्यांच्या संवर्धन व देखरेखीसाठी कार्यरत असलेल्या श्री दुर्गसंवर्धन या संस्थेच्या सदस्यांना शिवकालीन शिवराई नाणी प्रबळगडावर सापडली आहेत. शिवाजी महाराजांच्या १६८० ते पेशवेकाळात १८१८मध्ये ही नाणी चलनात होती.
पनवेल शहरापासून सुमारे १२ किमी अंतरावर बेलवली, वारदोली या ठिकाणी असलेल्या प्रबळगडावर शिवराई नाणी सापडली आहेत. श्री दुर्गसंवर्धन ही संस्था महाराष्ट्रभर किल्ल्यांचे संवर्धन, महाराजांचा इतिहास तरुण पिढीपर्यंत पोहोचविणे, ऐतिहासिक वास्तूंचे जतन करणे, इतिहासाची ओळख जपणे आदी कामे करते. या दरम्यान महाराष्ट्रभर भ्रमंती करते वेळी या संस्थेतील सदस्यांना इतिहासाची उजळणी करणाऱ्या वस्तू, शीलालेख, मूर्ती सापडत असतात. यापूर्वी सातारा, रत्नागिरी या जिल्ह्यांतील सीमेवर वासोटा किल्ल्यावर अशाच प्रकारची शिवराई नाणी सापडली होती. पनवेलमध्ये जानेवारी महिन्यात प्रबळगडावर स्वछता मोहीम राबवताना श्री दुर्गसंवर्धन या संस्थेत कार्यरत असलेले सागर मुंडे या तरुणाला ही नाणी सापडली आहेत. ताब्यांच्या धातूपासून बनविलेली ही नाणी अद्यापही आहे त्याच स्थितीत असलेली पाहावयास मिळतात. सध्याच्या चलनात असलेल्या एक रुपयाच्या आकाराची ही नाणी आहेत. सागर ने विविध ठिकाणच्या शिवकालीन मूर्ती, नाणी आपल्या वैयक्तिक सग्रहात जतन करून ठेवली आहेत. यापूर्वी पनवेल परिसरात ‘बीलन’ हे चांदीचे नाणे सापडले होते. एक बीलन म्हणजेच २१ ते २२ तांब्याची नाणी असे प्रमाण आहे.
शिवाजी महाराजांचा इतिहास हा गौरवशाली आहे. त्यांचे काम तरुण पिढीपर्यंत पोहेचविण्याचे काम श्री दुर्गसंवर्धन ही संस्था करते. या संस्थेत सुमारे ७० ते ८० तरु णांचा समावेश आहे.

Web Title: Swivel coins found at Prabalgad in Panvel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.