शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंचीही पंकजा मुंडेंना साथ; दसरा मेळाव्याला हजर राहण्याची घोषणा करत म्हणाले...
2
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
3
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराहला पुन्हा उप कॅप्टन्सीचा मान
4
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!
5
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?
6
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
7
"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या
8
१२० मिनिटांचा थरार, समोर होता मृत्यू, पण वैमानिकानं दाखवलं प्रसंगावधान, असं उतरवलं विमान 
9
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
10
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
11
तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
12
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
13
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
14
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
15
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
16
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
17
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
18
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
19
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
20
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी

पनवेलमधील प्रबळगडावर आढळली शिवराई नाणी

By admin | Published: February 10, 2017 4:18 AM

स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडमध्ये आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक आठवणी जिवंत असल्याचे दिसून येत आहे

वैभव गायकर , पनवेलस्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडमध्ये आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक आठवणी जिवंत असल्याचे दिसून येत आहे. पनवेलमधील प्रबळगडावर सापडलेली नाणी हे याचेच साक्षीदार आहेत. किल्ल्यांच्या संवर्धन व देखरेखीसाठी कार्यरत असलेल्या श्री दुर्गसंवर्धन या संस्थेच्या सदस्यांना शिवकालीन शिवराई नाणी प्रबळगडावर सापडली आहेत. शिवाजी महाराजांच्या १६८० ते पेशवेकाळात १८१८मध्ये ही नाणी चलनात होती. पनवेल शहरापासून सुमारे १२ किमी अंतरावर बेलवली, वारदोली या ठिकाणी असलेल्या प्रबळगडावर शिवराई नाणी सापडली आहेत. श्री दुर्गसंवर्धन ही संस्था महाराष्ट्रभर किल्ल्यांचे संवर्धन, महाराजांचा इतिहास तरुण पिढीपर्यंत पोहोचविणे, ऐतिहासिक वास्तूंचे जतन करणे, इतिहासाची ओळख जपणे आदी कामे करते. या दरम्यान महाराष्ट्रभर भ्रमंती करते वेळी या संस्थेतील सदस्यांना इतिहासाची उजळणी करणाऱ्या वस्तू, शीलालेख, मूर्ती सापडत असतात. यापूर्वी सातारा, रत्नागिरी या जिल्ह्यांतील सीमेवर वासोटा किल्ल्यावर अशाच प्रकारची शिवराई नाणी सापडली होती. पनवेलमध्ये जानेवारी महिन्यात प्रबळगडावर स्वछता मोहीम राबवताना श्री दुर्गसंवर्धन या संस्थेत कार्यरत असलेले सागर मुंडे या तरुणाला ही नाणी सापडली आहेत. ताब्यांच्या धातूपासून बनविलेली ही नाणी अद्यापही आहे त्याच स्थितीत असलेली पाहावयास मिळतात. सध्याच्या चलनात असलेल्या एक रुपयाच्या आकाराची ही नाणी आहेत. सागर ने विविध ठिकाणच्या शिवकालीन मूर्ती, नाणी आपल्या वैयक्तिक सग्रहात जतन करून ठेवली आहेत. यापूर्वी पनवेल परिसरात ‘बीलन’ हे चांदीचे नाणे सापडले होते. एक बीलन म्हणजेच २१ ते २२ तांब्याची नाणी असे प्रमाण आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास हा गौरवशाली आहे. त्यांचे काम तरुण पिढीपर्यंत पोहेचविण्याचे काम श्री दुर्गसंवर्धन ही संस्था करते. या संस्थेत सुमारे ७० ते ८० तरु णांचा समावेश आहे.