उमेदवारांना चिन्ह वाटप
By Admin | Published: May 13, 2017 01:26 AM2017-05-13T01:26:18+5:302017-05-13T01:26:18+5:30
पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी ४१८ उमेदवार रिंगणात आहेत. शेकाप, भाजपा, शिवसेना यांच्यासह अनेक लहान-मोठे मोठे
लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी ४१८ उमेदवार रिंगणात आहेत. शेकाप, भाजपा, शिवसेना यांच्यासह अनेक लहान-मोठे मोठे पक्ष निवडणुकीत उतरले असून शुक्रवारी सर्व उमेदवारांना निवडणुकीत चिन्ह वाटप करण्यात आले. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरु वात झाली आहे.
भाजपाने निवडणुकीपूर्वीच आपल्या कमळ चिन्हाद्वारे प्रचार सुरू केला होता. शेकापने देखील सर्वत्र मोठ्या प्रमाणात कपबशीची जाहिरात केल्याचे पहावयास मिळाले. शिवसेना देखील सोशल मीडीयाच्या माध्यमातून आपले चिन्ह धनुष्यबाण मतदारापर्यंत पोहचवत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीने देखील काही प्रभागात महाआघाडीच्या माध्यमातून पंजा, घड्याळ चिन्हावर आपले उमेदवार उभे केले आहेत.
सर्व प्रमुख पक्षांचा विषय सोडला तर अनेक बंडखोर, लहान पक्षाचे उमेदवार हे निवडणूक चिन्हाच्या प्रतीक्षेत होते. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार गुरुवारी उमेदवारांची अंतिम यादी व चिन्ह वाटपाची प्रक्रि या पूर्ण झाल्यांनतर सर्व उमेदवारांना आपले चिन्ह प्राप्त झाले आहेत. त्यामुळे आता अपक्षांकडूनही शहरात प्रचाराची रणधुमाळी उठण्याची शक्यता आहे.