शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

घे पंगा खेळाचा, कर दंगा विजयाचा ! नमो चषक 2024 व सांस्कृतिक क्रीडा महोत्सवांचा शुभारंभ

By नारायण जाधव | Published: January 13, 2024 3:15 PM

या फुटबॉल स्पर्धेमध्ये एकूण 56 संघांनी भाग घेतला असून त्यात महिला व पुरुष असे दोन गट या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. 

नवी मुंबई :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या "नमो चषक 2024"चे (फुटबॉल स्पर्धेचे) उद्घाटन  आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या शुभहस्ते शनिवारी डॉन बॉस्को स्कुल, सेक्टर-42, नवी मुंबई येथे मोठ्या जल्लोषात पार पडले. यावेळी आमदार म्हात्रे प्रसारमांशी बोलतांना पुढे म्हणाल्या की,  काल नमो चषकाचा शुभारंभ हा महाराष्ट्रामधील नाशिक शहरात झाला असून आज नवी मुंबईमधील 151 बेलापूर विधानसभामध्ये माजी नगरसेवक भरत जाधव व त्यांचे सहकारी यांच्या माध्यमातून पंढरपूर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असून भीमा नदीच्या काठावर वसलेले विठ्ठल रुक्मिणी मंदिर भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र असून विठ्ठल रुक्मिणीची थाटामाटात पालखी काढून स्पर्धेची सुरुवात केली.

तसेच या नमो चषक 2024  मध्ये  विविध प्रकारच्या खेळाचा समावेश करण्यात आला असून त्यात बुद्धिबल, कॅरम, नृत्य, गायन, वेशभूषा, कुस्ती, वक्तृत्व स्पर्धा, 100 मी धावणे, 400 मी धावणे, कबड्डी, कुस्ती, क्रिकेट, मेहंदी, पाककला, चित्रकला अशा विविध अनेक स्पर्धा या नमो चषकाच्या माध्यमातून तरुणांना व विद्यार्थ्यांना खेळण्यास मिळणार आहे. तसेच या फुटबॉल स्पर्धेमध्ये एकूण 56 संघांनी भाग घेतला असून त्यात महिला व पुरुष असे दोन गट या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. 

तसेच त्या पुढे म्हणाल्या की, नमो चषकाच्या माध्यमातून "सुदृढ भारत, निरोगी भारत" राहो अशी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना राहीली आहे, आणि नेहमीच त्यांच्या माध्यमातून भविष्यातील भारत घडवण्यासाठी ते प्रयत्न करीत आहेत. त्यात खेळाला महत्व नसून या खेळाच्या माध्यमातून लोकांना जोडणं, त्यांच्याशी संवाद साधने, त्यांच्या तब्येतेची काळजी घेणे असे असून या फूटबॉलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे शरीर निरोगी राहते त्याच बरोबर त्यांच्या शाळेचे नाव ही उंचावते. या नमो चषकाच्या माध्यमातून बेलापूर मतदारसंघातील तब्बल 50 हजार खेळाडू जोडणार असून बेलापूर विधानसभा क्षेत्रामधील खेळाडूंना एक व्यासपीठ निर्माण होणार आहे.

तसेच एकंदरीत सिबिडी-बेलापूर येथे 10 दिवस विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी नवी मुंबईकरांना अनुभवयास मिळणार आहे.     सदर स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त स्पर्धकांनी आपली नाव नोंदणी https:namochashak.in या लिंक वर जाऊन नोंदणी करून घेण्याचे आवाहन  म्हात्रे यांनी केले आहे. 

यावेळी माजी जिल्हाध्यक्ष भगवान ढाकणे, माजी नगरसेवक तथा बेलापूर विधानसभा संयोजक निलेश म्हात्रे, माजी नगरसेवक दीपक पवार,  नगरसेविका कविता जाधव, भाजपा उत्तराखंड समाज अध्यक्ष हेम पांडे, आदित्य जाधव, रणजित निंबाळकर, अज्जू कदम, सिद्धेश कावले, सुरेश कुमार, रोहन पवार, गणेश कोनार, दिलीप चव्हाण, योगेश कावले व कार्यकर्ते उपस्थित होते.