शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

तलाठी कार्यालय बंद असल्याने नागरिकांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 11:00 PM

वारे गावातील प्रकार; सात महसुली गावांचा समावेश

नेरळ : कर्जत तालुक्यातील वारे येथील महसूल विभागाचे कार्यालय मागील दोन वर्षांपासून बंद करण्यात आले आहे. परिणामी, तलाठी कार्यालयात येणाऱ्या शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. येथील तलाठी कार्यालयाविना असून, वारे येथील तलाठी कार्यालय त्वरित सुरू करण्याची मागणी केली जात आहे.वारे तलाठी सजाअंतर्गत वारे, पोशीर, मानकीवली, देवपाडा, पोही, कुरुंग, चिंचवाडी या सात महसूल गावांसह परिसरातील वाड्या-पाड्या येतात. वारे येथील तलाठी कार्यालय या भागातील शेतकºयांना सोयीचे होते. मात्र, दोन वर्षांपूर्वी वारे गावातील एका खासगी जागेत असलेले कार्यालय, इमारत मोडकळीस आल्याने हे कार्यालय तेथून हलविण्यात आले आणि ग्रामपंचायत कार्यालयाजवळील जिल्हा परिषदेच्या बंद अवस्थेत आलेल्या वर्गखोलीत तलाठी कार्यालय सुरू करण्यात आले.मागील वर्षी अतिवृष्टीत रायगड जिल्हा परिषद वारे शाळेच्या इमारती धोकादायक अवस्थेत आल्याने तलाठी कार्यलयास दिलेली जागा पुन्हा शालेय विद्यार्थ्यांसाठी मोकळी करण्यात आली. तेव्हापासून वारे येथील तलाठी कार्यालय कळंब हलविण्यात आले आहे.दुर्गम भागातील शेतकºयांना सात-आठ किलोमीटरची पायपीट करून तलाठी कार्यालय गाठावे लागते. शेतीचा सातबारा उतारा, विविध दाखले, शैक्षणिक दाखले, ज्येष्ठ नागरिकांचे दाखले कार्यालयातूनच दिले जात असल्याने आता नागरिकांची गैरसोय होत आहे.वर्षभरापासून वारे येथील कार्यालय जागेअभावी बंद आहे. सध्या कळंब येथील कार्यालयातून कामकाज सुरू आहे. आम्ही वारे येथे कार्यालय पुन्हा सुरू व्हावे यासाठी प्रयत्न करत आहोत. जागा उपलब्ध करून देण्याकरिता ग्रामसभेत निवेदन दिले आहे.- व्ही. बी. मिरगणे, तलाठी, सजा वारे