तळोजा कारागृह होणार हायटेक; तळोजा कारागृहात कैद्यांसाठी ई मुलाखत युनिट 

By वैभव गायकर | Published: March 2, 2024 05:39 PM2024-03-02T17:39:45+5:302024-03-02T17:39:58+5:30

शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना भेटण्यासाठी येणाऱ्या नातेवाईकांची गैरसोय होत असते.

Taloja jail to be hi-tech; E Interview Unit for Prisoners in Taloja Jail | तळोजा कारागृह होणार हायटेक; तळोजा कारागृहात कैद्यांसाठी ई मुलाखत युनिट 

तळोजा कारागृह होणार हायटेक; तळोजा कारागृहात कैद्यांसाठी ई मुलाखत युनिट 

पनवेल:तळोजा कारागृह हा स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रातील पहिला कारागृह आहे.2008 साली सुरु झालेल्या या कारागृहात सध्याच्या घडीला 3200 पेक्षा जास्त कैदी शिक्षा भोगत आहेत.हि संख्या क्षमतेपेक्षा जास्त असल्याने कारागृह प्रशासनावर ताण येत आहे.तळोजा कारागृह अधिक हायटेक होणार आहे.दि.4 रोजी तळोजा मध्यवर्ती कारागृह याठिकाणी कैद्यांसाठी विविध सुविधा उभारणार आहे.

यामध्ये कारागृह प्रशासन लवकरच ई मुलाखत युनिट,कीस्कॉय मशीन सुविधा,अॅलन ग्रुप सुविधा आणि मुलाखत व कोर्टशेड उभारणार आहे.अपर पोलीस महासंचालक संजय सक्सेना यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उदघाटन सोहळा पार पडणार आहे.सक्सेना यांच्यासह कारागृह महानिरीक्षक अमिताभ गुप्ता,भायखळा कारागृहाचे उपमहानिरीक्षक योगेश देसाई आदी उपस्थित राहणार आहेत.तळोजा कारागृह हा व्हीआयपी कैद्यांसाठी प्रसिद्ध आहे.प्रसिद्ध अंडरवर्ल्ड डॉन अबु सालेम यांच्यासह अनेक कैद्यी याठिकाणी शिक्षा भोगत आहेत.

शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना भेटण्यासाठी येणाऱ्या नातेवाईकांची गैरसोय होत असते. ठरलेल्या दिवशी कैद्यांना भेटण्यासाठी या नव्या तंत्रज्ञान प्रणालीचा उपयोग होणार आहे.कैदी आणि नातेवाईकांना एकमेकांशी यामुळे संवाद साधता येणार आहे.याव्यतिरिक्त कोर्टशेड देखील याठिकाणी उभारण्यात येणार आहे. तळोजा कारागृहात पनवेल,रायगड,नवी मुंबई आणि मुंबई विभागातील कैदी शिक्षा भोगत आहेत.अंडर ट्रायल कैद्यांची संख्या याठिकाणी मोठी आहे.

Web Title: Taloja jail to be hi-tech; E Interview Unit for Prisoners in Taloja Jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.