तळोजा एमआयडीसीलाही लागली घरघर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 04:23 AM2018-04-15T04:23:04+5:302018-04-15T04:23:04+5:30
- वैभव गायकर
पनवेल : राज्यातील प्रमुख औद्योगिक वसाहतीमध्ये समावेश असलेल्या तळोजा एमआयडीसीलाही घरघर लागली आहे. प्रदूषणाचा प्रश्नही गंभीर झाला आहे. पार्किंगसाठी एकही वाहनतळ नाही. सक्षम अग्निशमन यंत्रणा नाही. दीड लाख नागरिकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या या औद्योगिक वसाहतीला घरघर लागली असून, येथील प्रश्न सोडविण्याकडे शासनही दुर्लक्ष करत आहे.
तळोजा औद्योगिक वसाहतीत एकूण ९७५ कारखाने आहेत. यापैकी ८५२ कारखाने सुरू आहेत, तर १२३ कारखाने बंद पडले आहेत. विशेष म्हणजे, ३५०पेक्षा जास्त कारखाने हे रासायनिक कारखाने आहेत. तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये येथील घोट, तोंडरे, नितलस, खैरणे, ढोंगºयाचा पाडा, देवीचा पाडा, काणपोळी, वलप, पडघे, कोळवाडी, घोट कँप, पेंधर, वावंजे आदी गावातील शेतकºयांच्या जमिनी संपादित झालेल्या आहेत. मात्र, अद्याप अनेक शेतकºयांना संपादित जमिनींचा मोबदला मिळालेला नाही. विशेष म्हणजे, औद्योगिक वसाहतीच्या स्थापने वेळी दिलेली आश्वासनेही पाळण्यात आली नसल्याची तक्र ार येथील शेतकरी करीत आहेत. एवढ्या मोठ्या एमआयडीसीमध्ये एक रुग्णालयदेखील उभारण्यात आलेले नाही. औद्योगिक वसाहतीत अद्याप राखीव असलेल्या पार्किंगसाठी स्वतंत्र भूखंड ठेवण्यात आले नसल्याने संपूर्ण औद्योगिक वसाहतीला अवजड वाहनांचा वेढा घातलेला दिसून येत आहे. विशेष म्हणजे ज्वलनशील पदार्थांनी भरलेले टँकरदेखील रस्त्यांवर सर्रास उभे असलेले नजरेत पडत आहेत. औद्योगिक वसाहतीमध्ये अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला डेब्रिजचे ढिगारे टाकलेले आहेत. औद्योगिक वसाहतीमधील सांडपाण्यावर प्रक्रि या केल्या जाणाºया सीईटीपी प्रकल्पालगतच्या रस्त्याच्या कडेला डेब्रिजचे मोठे-मोठे ढिगारे नजरेस पडत आहेत. कारखानदारांमार्फत शासनाला हजारो करोडोंचा महसूल प्राप्त होत असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या मेक इन इंडियाच्या नाºयाला खरोखरच सत्यात उतरावयाचे असल्यास या ठिकाणी सुविधा देणे गरजेचे आहे.
उघडी गटारे, ड्रेनेजची अर्धवट कामे
औद्योगिक वसाहतीत फेरफटका मारल्यास अनेक ठिकाणी उघडी गटारे, तसेच अर्धवट ड्रेनेजची कामे सहज नजरेत पडतात. ही कामे अग्रक्र माने मार्गी लावणे गरजेचे आहे.
पार्किंगची समस्या गंभीर
तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये पार्किंगची भीषण समस्या आहे. एकही अधिकृत वाहनतळ नसल्याने संपूर्ण औद्योगिक वसाहतीमधील रस्ते अवजड वाहनांच्या अनधिकृत पार्किंगने गजबजलेले असतात. विशेष म्हणजे, यापैकी अनेक वाहने ही ज्वलनशील पदार्थाने भरलेली असतात. यामुळे कोणत्याही क्षणी मोठी दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
प्रदूषणाचा विषय हरित लवादाकडे
तळोजा औद्योगिक वसाहतीत प्रदूषणासंदर्भात नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी हरित लावादाकडे धाव घेतली आहे. नुकतेच हरित लवादाने येथील सीईटीपी प्रकल्पाला प्रदूषणासाठी जबाबदार धरत पाच कोटींचा दंड ठोठावला आहे.
औद्योगिक वसाहतीत पार्किंगची समस्या खूप गंभीर आहे. यासंदर्भात तोडगा निघणे गरजेचे आहे. या व्यतिरिक्त ड्रेनेजची कामेदेखील लवकरात लवकर पूर्ण केली गेली पाहिजेत.
- संदीप डोंगरे, अध्यक्ष, टीएमए
एमआयडीसी स्थापने वेळी स्थानिक शेतकºयांना दिलेली आश्वासने अद्याप पाळलेली नाहीत. अनेक शेतकºयांना जमिनीचा मोबदला मिळाला नाही. पार्किंग, प्रदूषण आदीसह खेळण्यासाठी मैदानेदेखील ठेवण्यात आलेली नाहीत.
- ज्ञानेश्वर पाटील,
स्थानिक नगरसेवक,
प्रभाग क्र मांक-१