नगरपरिषदेत १ कोटी ८६ लाखांचा कर जमा
By admin | Published: November 12, 2016 06:36 AM2016-11-12T06:36:18+5:302016-11-12T06:36:18+5:30
राज्य शासनाच्या संस्था तसेच सर्व स्थानिक स्वराज्य संस्था यांची देणी व जनतेकडून पाणी, वीज, मालमत्ता कर यासह इतर शासकीय देयकांचा भरणा करताना ५०० आणि १००० रु पयांच्या
जयंत धुळप, अलिबाग
राज्य शासनाच्या संस्था तसेच सर्व स्थानिक स्वराज्य संस्था यांची देणी व जनतेकडून पाणी, वीज, मालमत्ता कर यासह इतर शासकीय देयकांचा भरणा करताना ५०० आणि १००० रु पयांच्या जुन्या चलनी नोटा शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत स्वीकारण्याची परवानगी केंद्र शासनाने राज्य सरकारला दिल्यावर करदात्यांनी जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदांमध्ये गर्दी केली होती. परिणामी जिल्ह्यातील नऊ नगरपरिषदांमध्ये शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत १ कोटी ८६ लाख ८७ हजार ५६९ रुपये कर रक्कम जमा झाली आहे. कर भरणा रात्री ११ वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याने हा कर भरणा आकडा अडीच कोटी रुपयांपर्यंत पोहोचणार आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक कर भरणा खोपोली नगरपरिषदेत ४५० करदात्यांनी ५५ लाख रुपये केला. अलिबाग १२ लाख ८० हजार, श्रीवर्धन ६ लाख, माथेरान १३ लाख ५४ हजार ५६९, पेण २३ लाख ७ हजार, महाड १५ लाख, रोहा ८ लाख, उरण १० लाख तर कर्जत ४३ लाख ४६ हजार रुपयांचा कर भरणा झाला आहे. देणी दिली गेली यापेक्षा ५०० व १००० रुपयांच्या रद्द झालेल्या नोटा विनासायास वटल्या गेल्या याचा आनंद करदात्यांमध्ये अधिक होता तर यंदा वसुलीचे काम सोपे झाले, कष्ट आणि वसुलीच्या निमित्ताने शहरात करदात्यांबरोबर होणारे वाद टळले याचा मोठा आनंद नगरपरिषदांच्या वसुली अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये दिसून आला.