शहरं
Join us  
Trending Stories
1
रविंद्र वायकरांची खासदारकी जाणार की राहणार? निकाल राखीव ठेवला
2
प्रवाशांनी उड्या मारल्या, आरोपी बॅग घेऊन पळाला अन्... कुर्ला बस अपघाताचा CCTV समोर
3
कुर्ल्यात बसने चिरडलेल्या महिलेच्या हातातून काढल्या सोन्याच्या बांगड्या; पोलिसांकडून शोध सुरु
4
शिंदे गटाला गृह अन् महसूल खाते मिळणार नाही?; अमित शाह-फडणवीसांमध्ये दिल्लीत बैठक
5
Stock Market News: निफ्टीच्या विकली एक्सपायरीवर बाजार सुस्त; सेन्सेक्स-निफ्टी फ्लॅट, मेटल-IT स्टॉक्स मजबूत
6
आणखी भव्यदिव्य होणार शाहरुखचा 'मन्नत' बंगला, कोट्यवधींचा खर्च करुन करणार मोठा बदल
7
तुमची पत्नी ५ स्मार्ट पद्धतीनं वाचवू शकते तुमचा Income Tax! कमाईही करू शकते डबल; म्हणाल 'वाह क्या बात है!'
8
"दोन नात्यात राहणं सोपं नव्हतं, पण..", रीना रॉय आणि पत्नीला एकत्र डेट करत होते शत्रुघ्न सिन्हा, दिली कबुली
9
अंबादास दानवेंचे विरोधीपक्षनेते पद धोक्यात; संख्याबळ समान झाल्याने काँग्रेसला हवे झाले...
10
कुणी महिन्याला ५० हजार कमावतं तर कुणी १ लाख...; 'या' गावातील लोकांचं आयुष्यच बदललं
11
बोअरवेलमध्ये अडकलेल्या ५ वर्षीय आर्यनचा मृत्यू; ५६ तासांनी बाहेर काढल्यानंतर थांबला होता श्वास
12
'आई कुठे काय करते'च्या कलाकारांनी केलं कौमुदीचं केळवण, अभिनेत्री लवकरच बांधणार लग्नगाठ
13
संपादकीय: धनखड यांच्यावरील विरोधकांचा अविश्वास की इष्टापत्ती?
14
महायुतीचा फॉर्म्युला; सहा आमदारांमागे एक मंत्रिपद; विस्तारासाठी फडणवीस, अजित पवार दिल्लीत
15
आजचे राशीभविष्य - १२ डिसेंबर २०२४: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
16
केजरीवाल धास्तावले?- छावणीत चिंतेचे सावट!
17
परभणी बंदला हिंसक वळण; जमावबंदी लागू; तणाव कायम
18
सातपुड्यात दवांचा बर्फ; तापमान आले ६ अंशांवर; काश्मीरसारख्या थंडीचा अनुभव
19
जामिनासाठी न्यायाधीशाने मागितले पाच लाख; चौघांवर गुन्हा दाखल
20
गुलाब घेऊन विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांचे स्वागत; राहुल गांधींनी राजनाथ सिंह यांना दिला तिरंगा

करवसुलीवरून संघर्ष पेटण्याची चिन्हे

By admin | Published: June 19, 2016 4:13 AM

विविध करांच्या वसुलीसाठी महापालिकेने धडक मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत तब्बल ४८५ थकबाकीदारांची बँक खाती गोठविण्यात आली आहेत. महापालिकेच्या या कारवाईमुळे उद्योजकांत

- कमलाकर कांबळे,  नवी मुंबई

विविध करांच्या वसुलीसाठी महापालिकेने धडक मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत तब्बल ४८५ थकबाकीदारांची बँक खाती गोठविण्यात आली आहेत. महापालिकेच्या या कारवाईमुळे उद्योजकांत असंतोष पसरला असून, येत्या काळात या मुद्द्यावरून महापालिका आणि उद्योजकांत संघर्ष पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्थानिक संस्था कर अर्थात एलबीटी आणि मालमत्ता हे महापालिकेचे दोन महत्त्वाचे उत्पन्नाचे स्रोत आहेत. परंतु महापालिकेला कर भरण्यास उद्योजकांचा सुरुवातीपासून विरोध आहे. असे असले तरी यासंदर्भात न्यायालयाने ८ जुलै २0१0 रोजी महापालिकेच्या बाजूने निर्णय दिला आहे. परंतु त्यानंतरही अनेक उद्योजक कराचा भरणा करत नसल्याने अशा थकबाकीदारांवर कायदेशीर कारवाई करण्याचे तंत्र महापालिकेने अवलंबिले आहे. त्यानुसार महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. १ एप्रिल ते १६ जून २0१६ या कालावधीत तब्बल २१३ कोटींचा एलबीटी कर वसूल करण्यात आला आहे. गेल्या आर्थिक वर्षात याच कालावधीत एलबीटीची ही वसुली फक्त ९९ कोटी इतकी होती. एकूणच गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी एलबीटी कराच्या वसुलीत ११५ कोटींची वाढ झाली आहे. ही वसुली करताना प्रशासनाकडून कठोर धोरण अवलंबिण्यात आले आहे. याअंतर्गत तब्बल ४८५ थकबाकीदारांची बँक खाती सील करण्यात आली आहेत. आगामी काळात कायदेशीर मार्गाचा अवलंब करीत ही मोहीम अधिक तीव्र करण्याचा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे.दरम्यान, महापालिकेच्या या कारवाईचा एमआयडीसीतील उद्योजकांनी तीव्र विरोध केला आहे. ही करवसुली मनमानी असल्याचा आरोप उद्योजकांनी केला आहे. महापालिका एमआयडीसी परिसरातून कोट्यवधींचा कर वसूल करते. परंतु त्या बदल्यात कोणत्याही सुविधा पुरविल्या जात नाहीत. विशेष म्हणजे एमआयडीसीतील कारखानदारांकडून कर वसूल करण्याचा महापालिकेला कायद्याने कोणताही अधिकार नसल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे. चुकीची करप्रणाली निर्माण करून उद्योजकांच्या मूलभूत हक्कावर महापालिका गदा आणत असल्याचा आरोपही उद्योजकांनी केला आहे.१,३७१ थकबाकीदारांना नोटिसाएलबीटी कराच्या वसुलीबरोबरच महापालिकेने मालमत्ता कराच्या थकीत वसुलीसाठीही कंबर कसली आहे. याअंतर्गत १,३७१ थकबाकीदारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तर १ एप्रिल ते १६ जून २0१६ या कालाधीत राबविण्यात आलेल्या विशेष वसुली मोहिमेअंतर्गत १२६ कोटींचा मालमत्ता कर वसूल करण्यात आला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत मालमत्ता कराची ही वसुली केवळ ८0 कोटी रुपये इतकी होती. यावर्षी त्यात ४६ कोटींची वाढ झाली आहे.उद्योजकांना एमआयडीसी पाणीपुरवठा करते. त्याचे शुल्कही तीच आकारते, त्याशिवाय ड्रेनेज, अग्निशमन, रस्ते, बांधकाम परवानग्या आदी सुविधा एमआयडीसीकडूनच पुरविल्या जातात. ही वस्तुस्थिती असताना पालिकेला कर का भरावे? असा सवाल उद्योजक उपस्थित करत आहेत. महापालिकेची करवसुली पूर्णत: बेकायदेशीर आहे. कारण २0१0 मध्ये याप्रकरणी उच्च न्यायालयाने महापालिकेच्या बाजूने निकाल दिला असला तरी उद्योजकांनी त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्याचा निकाल आमच्याच बाजूने लागेल याची खात्री आहे. विशेष म्हणजे महापालिकेने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा न करताच सक्तीने सुरू केलेली करवसुली पूर्णत: बेकायदेशीर आहे. - राजा भुजले, संयुक्त सचिव, लघू उद्योजक संघटना