शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : निवडणुकीदिवशीच सोलापुरात ठाकरे गटाला धक्का! सुशीलकुमार शिंदेंचा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार
4
Vidhan Sabha 2024: महिला उमेदवारांचे त्रिशतक; आतापर्यंतचा उच्चांक!  
5
RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल; रिझर्व्ह बँकेनं नागरिकांना केलं सावध, म्हणाले...
6
शिंदेंच्या शिवसेनेकडून बनावट पत्र, राज ठाकरे संतापले; "वरळीकर मतदार सूज्ञ..." 
7
चंदा कोचर यांच्याविरोधात कारवाई करू नका, उच्च न्यायालयाचे एसएफआयओला निर्देश 
8
Sharad Pawar: सुप्रिया सुळेंवर मतदानाच्या आदल्या दिवशी गंभीर आरोप; शरद पवारांनी एका वाक्यात विषय संपवला!
9
विधानसभा निवडणुकीत 'आप' कोणाला तिकीट देणार? अरविंद केजरीवालांकडून मोठा खुलासा
10
सदा सरवणकरांच्या कोटवर दिसला उलटा 'धनुष्यबाण'; मनसेच्या अमित ठाकरेंनी केला सरळ
11
Jio New Recharge: केवळ इतक्या रुपयांमध्ये मिळणार वर्षभरासाठी अनलिमिटेड 5G डेटा; पाहा डिटेल्स
12
"गुंडगिरी खपवून घेणार नाही, २ तासांचा वेळ, नाहीतर..."; केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल संतापल्या
13
कंगना रणौतने चक्क आर्यन खानचं केलं कौतुक; म्हणाली, "फिल्मी कुटुंबातून येऊनही..."
14
Parali Vidhan Sabha Election 2024: परळीत गैरप्रकार, कॅमेरे बंद ठेवले; महिलांनी भितीच्या वातावरणात केले मतदान
15
२१३ कोटींच्या दंडाला  ‘मेटा’ देणार आव्हान; स्पर्धाविरोधी कृत्याबाबत आयोगाचा ठपका
16
Pune Vidhan Sabha Election 2024 : जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ५.५३ टक्के मतदान, सर्वाधिक ७.४४ टक्के मतदानाची कसब्यात नोंद
17
पनवेल रुग्णालयात नवजात बालकाचा मृत्यू; आरोग्य व्यवस्थेच्या निष्क्रियतेचा आणखी एक बळी
18
IND vs SA 4th T20: भारताचा राग अंपायरवर काढायला गेला, ICC चांगलाच दणका दिला!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
20
"प्रत्येकीला ३००० द्यायचेत ना?" विनोद तावडे प्रकरणावरुन आस्ताद काळेची टिप्पणी

महापालिकेच्या २० मालमत्तांचा कर थकला

By admin | Published: November 17, 2016 6:36 AM

मालमत्ता कर विभागात घोटाळा झाला की व्यवहारामध्ये अनियमितता आहे यावरून स्थायी समितीमध्ये पुन्हा गदारोळ झाला.

नवी मुंबई : मालमत्ता कर विभागात घोटाळा झाला की व्यवहारामध्ये अनियमितता आहे यावरून स्थायी समितीमध्ये पुन्हा गदारोळ झाला. प्रशासनाने बिले न दिलेल्या मालमत्तांची यांदी नगरसेवकांना दिली असून पालिकेच्याच २० मालमत्तांचा कर बाकी असल्याची धक्कादायक माहिती दिली असून यादीमधील त्रुटीवर नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. पूर्ण चौकशी झाल्याशिवाय घोटाळा झाल्याचे जाहीर करून पालिकेची बदनामी केली जात असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी मालमत्ता कर विभागात जवळपास १ हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याची माहिती प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचविल्याचा आरोप नगरसेवकांनी मागील बैठकीमध्ये केला होता. या वेळी प्रशासनाच्या वतीने ३ हजारपेक्षा जास्त मोकळ्या भूखंडांना बिलेच दिली नसल्याचे निदर्शनास आणून दिले होते. सदस्यांनी या भूखंडाची मागितलेली यादी प्रशासनाने सदस्यांना दिली आहे. या यादीमधील माहितीवरून सभागृह नेते जयवंत सुतार यांनी प्रशासनास धारेवर धरले. प्रशासनाने दिलेल्या यादीमध्ये महापालिकेच्या २० वास्तूंचा समावेश आहे. सिडकोच्या १३, एमआयडीसीच्या ३, महावितरणच्या १९ यांच्यासह सामाजिक संस्था, संघटनांचा समावेश आहे. मालमत्ता कर विभागाने जे मोकळे भूखंड दाखविले आहेत त्यांच्यावर यापूर्वीच इमारतींचे बांधकाम झाले असून तेथील नागरिक करांचा भरणा करत असल्याचेही सुतार यांनी निदर्शनास आणून दिले. कोणतीही चौकशी न करता व घोटाळाच झाल्याची स्पष्ट माहिती नसताना प्रसारमाध्यमांमधून खोटी माहिती देऊ नका, या शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. पूर्ण चौकशी करा, या मालमत्तांचे लेखा परीक्षण करा व त्यानंतर त्यामध्ये काही आढळले तर बिनधास्त कारवाई करा; पण त्यासाठी पालिकेची बदनामी करू नका, असेही मत त्यांनी व्यक्त केले. सभापती शिवराम पाटील, एम. के. मढवी, भारतीताई कोळी, अशोक गुरखे यांनीही मालमत्ता कर विभागाच्या कारवाईविषयी नाराजी व्यक्त केली. महापालिकेच्या वास्तूंचा कर थकीत असल्याचे यादीमध्ये कसे दाखविले. अशाप्रकारे चुकीची माहिती देऊ नका, अशा सूचनाही त्यांनी या वेळी दिल्या. अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांनी याविषयी स्पष्टीकरण देताना सांगितले की, प्रशासनाने नियमाप्रमाणे कार्यवाही सुरू केली आहे. याप्रकरणी अनियमितता निदर्शनास आल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असून त्यांची चौकशी सुरू आहे. याप्रकरणी चौकशी सुरू असल्यामुळे अधिक भाष्य करणे योग्य होणार नसल्याचे स्पष्ट केले.नियमाप्रमाणे बिले दिली महापालिकेचे उपआयुक्त उमेश वाघ यांनी आम्ही नियमाप्रमाणे जी थकीत रक्कम दिसली त्यांना बिले पाठविली आहेत. बिलांचे वितरण झाल्यानंतर त्यांच्याकडून बिलांचा भरणा का झालेला नाही किंवा इतर काही म्हणने असेल ते नोंदवून, कायद्याच्या चौकटीत राहूनच काम केले जाईल. या बिलांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रथम त्यांचे वितरण होणे आवश्यक असल्याचेही स्पष्ट केले.