साडेतीन कोटींची करवसुली
By admin | Published: November 16, 2016 04:50 AM2016-11-16T04:50:37+5:302016-11-16T04:50:37+5:30
पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द झाल्यामुळे राज्य शासनाने सरकारी देणी चुकवण्यासाठी जुन्या नोटा २४ नोव्हेंबरपर्यंत
पनवेल : पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द झाल्यामुळे राज्य शासनाने सरकारी देणी चुकवण्यासाठी जुन्या नोटा २४ नोव्हेंबरपर्यंत स्वीकारण्याचे घोषित केले आहे. नागरिकांनी थकित कराचा मोठ्या प्रमाणात भरणा केल्याने पनवेल महापालिकेत तब्बल ३ कोटी, ५५ लाखांची करवसुली झाली आहे.
चलनातून बाद झालेल्या नोटा सरकारी करवसुलीत स्वीकारणार असल्याची माहिती रिक्षामधून उद्घोषणा करून नागरिकांना देण्यात येत होती. त्यानुसार पनवेल पालिकेत जुन्या नोटा स्वीकारल्या जात असून पालिकेत कोट्यवधींचा महसूल करापोटी जमा झाला आहे. पाणी व घरपट्टीच्या माध्यमातून साडेतीन कोटींपेक्षा जास्त वसुली झाल्याची माहिती कर विभागाचे अनिल जगधानी यांनी दिली. (वार्ताहर)