शिक्षकांनी दिली जीवनाला कलाटणी....
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2020 01:20 AM2020-09-05T01:20:21+5:302020-09-05T01:20:55+5:30
आई-वडिलांचे संस्कार, सर्व शिक्षकांच्या मोलाच्या मार्गदर्शनामुळे उद्योजक, रायगड जिल्ह्यातील प्रथम नागरिक होण्याचा मान मिळाला. यात शिक्षकांनी केलेल्या संस्कारांचा वाटा खूप मोठा आहे.
- वैभव गायकर
पनवेल : शिक्षकांचे संस्कार, आपुलकी, गरीब विद्यार्थ्यांना मदतीचा देण्यात येणारा मदतीचा हात, शिक्षणाची पद्धती या सर्व गोष्टीचा प्रभाव जीवनावर पडल्याने जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रात काम करू करू शकलो, अशा शब्दांत माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी शिक्षकांचे ऋण व्यक्त केले.
आई-वडिलांचे संस्कार, सर्व शिक्षकांच्या मोलाच्या मार्गदर्शनामुळे उद्योजक, रायगड जिल्ह्यातील प्रथम नागरिक होण्याचा मान मिळाला. यात शिक्षकांनी केलेल्या संस्कारांचा वाटा खूप मोठा आहे. -रामशेठ ठाकूर
मराठी भाषेविषयी आपुलकी निर्माण केली भोसले सरांनी
साताऱ्यातील रयत
शिक्षण संस्थेत मराठी वाङ्मय या विषयासाठी दत्ता भोसले सर होते. त्यांचा मराठीवर पगडा, वक्तृत्व हे खरोखरच मनाला भावलेले होते. मराठी विषय शिकवताना संत वाङ्मयाची परंपरा त्यांनी शिकविल्यावर कोणत्याही विषयावर भावना तयार होण्याचे काम त्यांच्यामुळे झाले.
रयत शिक्षण संस्थेच्या शिक्षकांमुळेच घडलो
माझे, प्राथमिक शिक्षण अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत झाले. आम्ही शिकत असलेल्या गव्हाण येथील शाळेच्या पडिक भिंती, शाळेच्या बाजूला गुरांचा गोठा असताना तत्कालीन शिक्षक एस.पाटील सर, येवले सर, गांजाळे सर आदींनी आम्हाला शिक्षण दिले. शिक्षणाविषयी मनात सकारात्मक वातावरण निर्माण करण्यात या शिक्षकांचा वाटा आहे.
अनेक महिने पगार नसताना शिक्षणदानात या शिक्षकांनी खंड पडू दिला नाही. साताºयात शिकताना शिक्षक दत्ता भोसले यांचा प्रभाव व संपूर्ण रयत शिक्षण संस्थेतील शिक्षकांचा वागण्याचा, बोलण्याचा, मदतीचा प्रभाव माझ्यावर कायम राहिला.
उनउने सरांच्या विचारसणीचा प्रभाव
मी १९६८ ते ७२ दरम्यानच्या काळात महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी सातारा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्यावेळचे प्राचार्य एस. के उनउणे (बापू) यांचा प्रभाव माझ्यावर पडला. आर्थिक परिस्थिती हालाखीची असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला गरजेनुसार एस.के उनउने (बापू) हे मदत करायचे. बापूंच्या याच संस्काराची शिदोरी कायम स्मरणात राहिली व खºया अर्थाने समाजाला मदतीचा हात देण्याची भावना मनात निर्माण झाली.
जिथे शिकलो तिथला पुरस्कार
ज्या शिक्षक संस्थेने अनेक विद्यार्थी घडविले. मी स्वत: ज्या संस्थेत शिकलो, नोकरी केली, अशा आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था असलेल्या रयत शिक्षण या संस्थेचा सर्वोच्च लक्ष्मीबाई पाटील (रयत माउली पुरस्कार) हा मला मिळाला. ही माझ्यासाठी अभिमानास्पद आणि समाधानाची बाब ठरली आहे.