शिक्षकांचे आंदोलन सुरूच
By Admin | Published: March 27, 2016 02:32 AM2016-03-27T02:32:13+5:302016-03-27T02:32:13+5:30
तुर्भे येथील आयसीएल मोनामी शाळेचे शिक्षक मागील सात दिवसांपासून साखळी उपोषणाला बसले आहेत. परंतु त्यांच्या प्रलंबित मागण्या व चर्चेसाठी बैठकीच्या निमंत्रणाला बगल देत
नवी मुंबई : तुर्भे येथील आयसीएल मोनामी शाळेचे शिक्षक मागील सात दिवसांपासून साखळी उपोषणाला बसले आहेत. परंतु त्यांच्या प्रलंबित मागण्या व चर्चेसाठी बैठकीच्या निमंत्रणाला बगल देत प्रशासनाकडून त्यांची दखल घेण्यात आलेली नाही. यामुळे हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा शिक्षकांनी दिला आहे.
शाळा व्यवस्थापनाकडून नाहक त्रास होत असल्याचे या शिक्षकांचे म्हणणे आहे. तसेच पर्यवेक्षिकेचे झालेले निलंबन रद्द व्हावे, अशीही त्यांची मागणी आहे. यासाठी आयसीएल मोनामी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी साखळी उपोषणाला बसले आहेत. मात्र सात दिवस होऊनही त्यांना संबंधित प्रशासनाकडून कसलाही प्रतिसाद मिळालेला नाही. पालिकेच्या शिक्षण मंडळालाही त्यांनी तोडगा काढण्यासाठी बैठक आयोजित करण्याचे सुचवले आहे. परंतु संबंधित पत्रावरही त्यांना कसलाच प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे जाणीवपूर्वक शिक्षकांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप विलास आंब्रे व निर्मला देसाई या शिक्षकांनी केला आहे. तसेच वेळीच प्रशासनाने दखल न घेतल्यास हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचाही इशारा संघटनेच्या वतीने त्यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)