- अरुणकुमार मेहत्रे कळंबोली : शिक्षकाची नोकरी मिळणे अवघड झाल्याने तरुणांनी अध्यापक विद्यालयांकडे पाठ फिरविली आहे. त्याचा फटका अध्यापक विद्यालयांना बसला आहे. विद्यार्थ्यांअभावी रायगड जिल्ह्यातील आठ अध्यापक विद्यालये बंद होण्याच्या मार्गावर आहेत.राज्य शासनाच्या उदारमतवादी धोरणामुळे खासगी शैक्षणिक संस्थांनीही डीएड अध्यापन सुरू केले आहे. या खासगी अध्यापक विद्यालयात कमी गुण असणाऱ्यांनाही प्रवेश मिळू लागला. त्यामुळे शेकडो तरु ण डीएड होऊन बाहेर पडले आहे. मात्र, कुठेही नोकरी मिळत नसल्याने या तरुणांची निराशा झाली आहे, तसेच अलीकडे डीएड झालेल्या तरु णांसाठी सीईटी परीक्षा अनिवार्य करण्यात आली.गुणवत्ता यादीत स्थान मिळत नसल्याने बेरोजगार शिक्षकांची फौज गावागावात दिसत आहे. डीएड बेरोजगारांची ही अवस्था पाहून आता तरुणांनी डीएडकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे अध्यापक विद्यालय बंद पडण्याच्या मार्गावर आहे. रायगड जिल्ह्यात एकूण वीस अध्यापक विद्यालये होती. त्यापैकी २0१५ साली दहा विद्यालये बंद करण्यात आली. उर्वरित दहापैकी आठ विद्यालयांमध्ये आता विद्यार्थीच नसल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.यात जिल्हा शैक्षणिक व्यावसायिक संस्था (पनवेल), शासकीय अध्यापक विद्यालय (माणगाव), डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय (पेझारी), पंचरत्न अध्यापक विद्यालय (पिरकोण), अंजुमान इ इस्लाम विद्यालय (म्हसळा), नवजीवन नेरळ (मराठी, इंग्रजी), प्रभाकर पाटील अध्यापक विद्यालय (वेश्वी) या विद्यालयांचा समावेश आहे.>बंद झालेली अध्यापक विद्यालयेकोकण उन्नती मित्र मंडळ अध्यापक विद्यालय, श्रीवर्धनजनता शिक्षण प्रसारक मंडळ अध्यापक विद्यालय, कामोठेओम नमो प्रतिष्ठान अध्यापक विद्यालय, खारघरपिल्लई अध्यापक विद्यालय, नवीन पनवेलडी एम एम अध्यापक विद्यालय, डिकसळसह्याद्री शिक्षण प्रसारक मंडळ अध्यापक विद्यालय, पेडलीजनता शिक्षण प्रसारक मंडळ अध्यापक विद्यालय, खारघरमहात्मा एज्युकेशन सोसायटी अध्यापक विद्यालय, रसायनीमहात्मा एज्युकेशन सोसायटी अध्यापक विद्यालय, नवीन पनवेलन्यू कळंबोली एज्युकेशन सोसायटी अध्यापक विद्यालय, कळंबोलीडीएड करूनही नोकरी मिळत नसल्याने तरुणांनी अध्यापक विद्यालयांकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे अनेक डीएड विद्यालये बंद करावी लागली आहेत. हीच परिस्थिती कायम राहिल्यास उर्वरित विद्यालये सुद्धा बंद होण्याची शक्यता आहे.- शिवराम सांगळे, अधीक्षक, पनवेल, डायट
अध्यापक विद्यालयांना घरघर, नोकरी नसल्याने तरुणांनी फिरविली पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 2:49 AM