विभागीय बोर्डावर शिक्षक महासंघाचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 03:45 AM2018-01-19T03:45:53+5:302018-01-19T03:46:04+5:30

शासनाच्या शिक्षणविरोधी धोरणांच्या विरोधात तसेच प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी गुरुवारी वाशी येथील मुंबई विभागीय शिक्षण मंडळाच्या कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते

 Teachers Federation League on Regional Board | विभागीय बोर्डावर शिक्षक महासंघाचा मोर्चा

विभागीय बोर्डावर शिक्षक महासंघाचा मोर्चा

Next

नवी मुंबई : शासनाच्या शिक्षणविरोधी धोरणांच्या विरोधात तसेच प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी गुरुवारी वाशी येथील मुंबई विभागीय शिक्षण मंडळाच्या कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने पुकारलेल्या आंदोलनाचा हा तिसरा टप्पा असून, यापूर्वी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात घोषणा करून शासनादेश काढण्याचे आश्वासन दिले; परंतु अधिवेशन संपून तीन आठवडे उलटूनही त्यासंबंधी कसलेही आदेश न निघाल्याने प्रचंड नाराजी या ठिकाणी व्यक्त करण्यात आली.
वर्षानुवर्षे शिक्षकांना मान्यता व वेतन न देता त्यांचे शोषण केले जात असल्याचा आरोप शिक्षक महासंघाच्या वतीने करण्यात आला.
८ डिसेंबर रोजी सर्व तालुका तहसील कार्यालयांवर आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर १९ डिसेंबर रोजी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले होते़

Web Title:  Teachers Federation League on Regional Board

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Strikeसंप