वेतनवाढीसाठी पालिका मुख्यालयाबाहेर शिक्षकांचे उपोषण
By योगेश पिंगळे | Published: September 4, 2023 11:46 AM2023-09-04T11:46:55+5:302023-09-04T11:47:16+5:30
वेतनात वाढ करावी तसेच इतर सुविधा लागू कराव्यात अशी मागणी मागील चार वर्षांपासून शिक्षकांच्या माध्यमातून केली जात आहे.
नवी मुंबई : महापालिकेच्या शिक्षण विभागात मागील अनेक वर्षांपासून काही शिक्षक ठोक मानधन पद्धतीने सेवा करत आहेत. महापालिका या शिक्षकांना तुटपुंजे मानधन देत असून या मानधनावर कुटुंबाचा उदर्निवाह करणे जिकरीचे बनले आहे.
वेतनात वाढ करावी तसेच इतर सुविधा लागू कराव्यात अशी मागणी मागील चार वर्षांपासून शिक्षकांच्या माध्यमातून केली जात आहे. मात्र महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शिक्षकांनी केला असून महापालिकेतील प्राथमिक माध्यमिक शिक्षक, बालवाडी शिक्षक आणी मदतनीस यांनी आज सोमवारी महापालिका मुख्यालयाबाहेर बेमुदत उपोषण सुरु केले आहे.