रोहा : आपल्या रोहे-अष्टमी नगरपरिषदेतील रोहे येथील शाळा, अष्टमी येथील शाळा, तसेच उर्दू शाळा या गुणवत्तेच्या दृष्टीने उल्लेखनीय काम करीत असून, खासगी शाळांइतकेच या शाळांतून दर्जेदार शिक्षण दिले जाते. कला, क्र ीडा व साहित्यिक या क्षेत्रातही उत्तम काम असून, विद्यार्थ्यांना अध्यापनाच्या माध्यमातून योग्य मार्गदर्शन शिक्षक वर्गाने केल्यास ही युवा पिढी निश्चितच आपल्या शाळेबरोबर गावाचेही नाव उज्ज्वल करेल. सर्व शाळांसाठी सर्व सुविधा प्राप्त करून देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन रोहे-अष्टमी नगरपालिकेचे नगराध्यक्ष संतोष पोटफोडे यांनी आणि शिक्षण प्रशासन अधिकारी शेख यांनी के ले. रोहे-अष्टमी उर्दू शाळांच्या मुख्याध्यापक व शालेय सेवकवर्ग यांच्या सभेत बोलत होते. या वेळी न. पा. शिक्षण समितीच्या सभापती पूर्वा मोहिते व सदस्य, नगरसेवक महेंद्र गुजर व महंमद डबीर उपस्थित होते. शिक्षकांकडून विद्यार्थ्यांसाठी संगणकाची मागणी करण्यात आली. ती त्वरित पूर्ण करण्याचे आश्वासन नगराध्यक्ष यांनी सभेत दिले. विद्यार्थ्यांच्या अभ्यासाबद्दल सर्व अध्यापक वर्गानी लक्ष द्यावे. तसेच पट वाढण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे सांगितले. (वार्ताहर)
शिक्षकांनी योग्य मार्गदर्शन करावे -पोटफोडे
By admin | Published: January 14, 2017 6:49 AM