तापमानाचा पारा ३७ अंशावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 02:19 AM2018-03-03T02:19:27+5:302018-03-03T02:19:27+5:30

शहरात गेल्या काही दिवसांत तापमानाचा पारा वाढला असून ३७ इतक्या कडक उन्हामुळे अंगाची काहिली होत असतानाच व्हायरल फीव्हर आणि घसादुखीच्या पेशंटमध्ये वाढ झाली आहे.

Temperature of 37 degrees Celsius | तापमानाचा पारा ३७ अंशावर

तापमानाचा पारा ३७ अंशावर

Next

पनवेल, नवी मुंबई : शहरात गेल्या काही दिवसांत तापमानाचा पारा वाढला असून ३७ इतक्या कडक उन्हामुळे अंगाची काहिली होत असतानाच व्हायरल फीव्हर आणि घसादुखीच्या पेशंटमध्ये वाढ झाली आहे. लहान मुलांनाही हीट स्ट्रोकचा त्रास होऊ लागला आहे. सर्दी, ताप आणि खोकला ही व्हायरल फीव्हरची लक्षणे मुलांमध्ये दिसू लागली असून रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे. किमान तापमानामध्ये वाढ झाल्याने नवी मुंबईकर घामाघूम झाले आहेत.
वातावरणात अचानक झालेल्या बदलाने व्हायरल फीव्हरच्या पेशंटची संख्या वाढू लागल्याचे बालरोगतज्ज्ञ डॉ. संदीप सावंत यांनी सांगितले. घसा खवखवणे, टॉन्सिल्स, खोकला आदी तक्र ारी वाढत असल्याचे सावंत यांनी सांगितले. उन्हाळ्यात पाण्याच्या कमतरतेमुळे अनेक ठिकाणी स्वच्छतेचा अभाव असतो व त्यातून कावीळ, डायरिया आणि गॅस्ट्रोची लागण होऊ शकते, मुलांची प्रतिकारशक्ती मुळात कमी असल्याने उघड्यावरील खाद्यपदार्थांपासून मुलांना दूर ठेवा असे आवाहन डॉ. सावंत यांनी केले आहे. उष्माघाताचे आणि व्हायरल इन्फेक्शनचे पेशंट येण्यास सुरु वात झाली आहे. त्यामुळे पेशंटना डीहायड्रेशनचा त्रास होतो किंवा अशक्तपणा जाणवू शकतो, असेही डॉक्टरांनी स्पष्ट केले. दुपारी ११ ते ४ यावेळेत घराबाहेर पडणाºया व्यक्तींनी स्वसंरक्षणासाठी स्कार्फ, टोपी, गॉगलचा वापर करावा तसेच आवश्यक नसल्यास घराबाहेर पडू नये असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
>वाढत्या उष्णतेमुळे शरीरात जाणवणाºया पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी रसाळ फळांचे सेवन केले जात असून या फळांची मागणी वाढली आहे. शीतपेय, फळांचा रस, ऊसाच्या गाड्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी पहायला मिळत आहे. शहाळ्यांनाही मोठ्या प्रमाणात मागणी असून एका शहाळ््याकरिता ४० ते ६० रुपये किंमत मोजावी लागत आहे.

Web Title: Temperature of 37 degrees Celsius

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.