शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
3
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
4
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
5
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
6
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
7
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
9
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
10
कपूर कुटुंबात लग्नाची लगबग, पापाराझींसमोर पडता पडता वाचली करिष्मा; व्हिडिओ व्हायरल
11
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
12
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
13
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
15
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
16
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
17
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
18
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
19
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
20
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती

प्र्रशासकीय भवनासाठी हवी दहा एकर जागा

By admin | Published: January 06, 2017 5:24 AM

पनवेल महानगरपालिका भवन भव्य असावे, यासाठी प्रशासनाने सिडकोकडे दहा एकर जागेची मागणी केली आहे. तसेच महापौर आणि आयुक्त निवासाकरिता नवीन पनवेल

अरुणकुमार मेहत्रे , कळंबोलीपनवेल महानगरपालिका भवन भव्य असावे, यासाठी प्रशासनाने सिडकोकडे दहा एकर जागेची मागणी केली आहे. तसेच महापौर आणि आयुक्त निवासाकरिता नवीन पनवेल व खारघरमध्ये भूखंड उपलब्ध करून देण्याबाबत प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. विभागीय कार्यालये ग्रामपंचायत व सिडको कार्यालयात ठेवण्याचे नियोजन आहे. यासंदर्भात सिडकोबरोबर सकारात्मक बोलणी सुरू असल्याचे समजते.महापालिकेत आयुक्तांबरोबरच, अतिरिक्त आयुक्त, उप आणि सहायक आयुक्तच प्रशासनात वरिष्ठ अधिकारी असणार आहेच. त्याचबरोबर अभियंत्याची भरतीही करण्यात येणार आहे. महापालिकेत विविध समिती, त्याचबरोबर सभापतींचा समावेश असेल. नगरपरिषदेपेक्षा महापालिकेचा कारभार विस्तारित होणार आहे. सध्या मनुष्यबळ कमी असल्याने जागेची अडसर जाणवत नाही. मात्र, भविष्यात कामकाजासाठी प्रशस्त इमारतीची आवश्यकता भासणार आहे. त्या दृष्टिकोनातून कोणत्या ठिकाणी महापालिकेचे मुख्यालय असू शकते, याबाबत सर्व्हे करण्यात आला आहे. खांदा वसाहतीतील सर्कस मैदान, आसुडगाव बस आगारासमोर मोकळे मैदान आणि खांदेश्वर रेल्वे स्थानकालगतची मोकळी जागा महापालिका भवन उभारण्याकरिता मिळावी, यासाठी सिडकोकडे आग्रह धरण्यात आला आहे. तक्का येथील जागेवर प्रस्तावित पनवेल महापालिकेचे प्रशासकीय भवन असावे, असा ठराव पूर्वी झाला होता; परंतु ही जागा अपुरी पडेल, तसेच येण्या-जाण्याच्या दृष्टीने सोईस्कर वाटत नाही. सिडको हद्दीतच महापालिका भवन असावे, असा प्रस्ताव आहे. तीन ठिकाणांपैकी एका ठिकाणी दहा एकर जागा उपलब्ध व्हावी, यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्न करीत आहे. तिथे महापालिका आयुक्त व इतर अधिकाऱ्यांकरिता दालन, विविध विभागांकरिता स्वतंत्र बसण्याची व्यवस्था, सुविधा केंद्र, सभागृह, शौचालय, पिण्याच्या पाण्याची सोय पाणी तसेच पार्किंगची व्यवस्था करण्याचा प्रस्ताव आहे. अत्याधुनिक स्वरूपाची सोय-सुविधा या ठिकाणी विकसित करण्याबरोबरच लिफ्ट, सरकते जिने, सीसीटीव्ही, वायफाय, स्वागत कक्षाची व्यवस्था असावी, असा प्रस्ताव आहे. राष्ट्रीय महामार्ग बाजूलाच आहे. त्याशिवाय बाजूलाच प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. नागरिकांना प्रशासकीय भवन अतिशय सहजपणे गाठता येईल. त्याचबरोबर नवीन पनवेल, कळंबोली, कामोठे आणि खारघर वसाहतीत विभागीय कार्यालये असणार आहेत.