शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
2
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
3
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
4
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
5
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
6
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
7
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
8
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
9
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
10
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
11
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
12
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
13
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
14
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
15
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
16
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
17
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
18
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
19
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
20
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव

आचारसंहिता संपल्यानंतर महाराष्ट्र भवनासह मेडिकलच्या निविदा; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

By नारायण जाधव | Published: May 25, 2024 6:23 PM

मुख्यमंत्र्यांचे सिडको, महापालिकेला निर्देश : मंदा म्हात्रेंचा पाठपुरावा

नवी मुंबई: नवी मुंबईत वाशी येथे सिडकोकडून उभारण्यात येणाऱ्या महाराष्ट्र भवनासह बेलापूर येथील नवी मुंबई महापालिकेच्या वतीने नियोजित मेडिकल काॅलेज आणि रुग्णालय बांधण्याची निविदाप्रक्रिया लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता ४ जून रोजी संपल्यानंतर लगेच सुरू करा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी महापालिका आयुक्त आणि सिडकोच्या व्यवस्थापकिय संचालकांना दिले असल्याची माहिती बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी पत्रकारांना दिली.

या दोन्ही वास्तूंची निविदा प्रक्रिया त्वरित सुरू करावी, या मागणीसाठी म्हात्रे यांनी शनिवारी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांच्या निवेदनावर चर्चा करून मुख्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्त कैलास शिंदे आणि सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी मोबाइलवर संपर्क साधून हे निर्देश दिले. असे असणार महाराष्ट्र भवनमहाराष्ट्र शासनाकडून नवी मुंबईतील वाशी रेल्वेस्थानकासमोर बांधण्यात येणाऱ्या महाराष्ट्र भवनाची नियोजित इमारत ही १४ माळ्यांची राहणार असून त्यात सर्व सुविधा असणार आहेत. या नियोजित महाराष्ट्र भवनामध्ये व्हीआयपी. रूम तसेच लोकप्रतिनिधी सोबत येणारे त्यांचे वाहनचालक किंवा कर्मचाऱ्यांकरिता ही रूमही असणार आहेत. त्याचबरोबर विविध भागांतून येणाऱ्या विद्यार्थी, अभ्यागतांसाठी विश्रांती कक्ष, ई-लायब्ररी, कॉन्फरन्स हॉल, फूड प्लाझा अशा अनेक विविध प्रकारच्या सर्व सुविधा असणार आहेत. या भवनासाठी २०१४ पासून आमदार म्हात्रेंनी पाठपुरावा केला आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये वित्तमंत्री असताना सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी १०० कोटींची तरतुदीची घाेेषणाही केली होती. मेडिकल कॉलेजचा खर्च ८१९ कोटीबेलापूर सेक्टर १५ मध्ये हा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज प्रकल्प हा ८.४० एकरांमध्ये उभारला जाणार असून अंदाजे ८१९.३० कोटी खर्च अपेक्षित आहे. यासाठी सीएसआर निधींचाही प्रयत्न केला जाणार आहे. यासाठीच्या भूखंडाची किंमतही आमदार मंदा म्हात्रे यांनी सिडकोकडून कमी करून घेतली आहे. ५०० खाटांचे हे रुग्णालय राहणार असून तळमजला अधिक ९ मजली असणार आहे. या ठिकाणी कर्करोग, हृदयरोग, मेंदूविकार अशा अनेक मोठमोठ्या आजारांवर उपचार केले जाणार आहेत. शिवाय पीजी/नर्सिंग शैक्षणिक वसतिगृह, पदव्युत्तर शैक्षणिक संकुल, अभियांत्रिकी यार्ड, रुग्णांसोबत येणाऱ्या नातेवाइकांना राहण्याकरिता धर्मशाळा, नर्सिंग वसतिगृह, अभ्यागत केंद्र, पदव्युत्तर विद्यार्थी वसतिगृह, वाहनतळ व इतर अनेक सुविधा उपलब्ध होणार आहेत.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईManda Mhatreमंदा म्हात्रेEknath Shindeएकनाथ शिंदेcidcoसिडको