शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

राष्ट्रवादी-सेनेच्या राड्याने शहरात तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2019 11:54 PM

परस्पर विरोधात तक्रारी दाखल : खुनाच्या प्रयत्नासह विनयभंगाचेही आरोप; ऐरोलीसह कोपरखैरणे बंद

नवी मुंबई : ऐरोलीत राष्ट्रवादी व शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या राड्यामुळे शहरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवसेना नगरसेवकांवर खुनाचा प्रयत्न झाल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. सेनेने राष्ट्रवादीच्या नेत्यांवरही मारामारी व विनयभंगाचे आरोप केले आहेत. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. दोन्ही पक्षांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले असून, ऐरोलीसह कोपरखैरणे परिसर बंद केला होता.

नवी मुंबईमध्ये राजकीयदृष्ट्या संवेदनशील परिसर म्हणून ऐरोलीची ओळख आहे. काही वर्षांपासून शांत असलेला हा परिसर शुक्रवारी राष्ट्रवादी व शिवसेनेमध्ये झालेल्या राड्यामुळे पुन्हा हादरून गेला आहे. सेक्टर ५ मधील महापालिकेने बांधलेल्या मंगलकार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांविरोधात भिडले. राड्यानंतर दोन्हीकडून एकमेकांविरोधात तक्रारी दाखल झाल्या आहेत. ऐरोलीचे आमदार संदीप नाईक यांनी शिवसेना नगरसेवक एम. के. मढवी यांनी नियोजबद्द कट करून राडा घडवून आणल्याचा आरोप पत्रकार परिषदेमध्ये केला आहे. महापालिकेच्या वास्तूचे उद्घाटन करण्यासाठी आमंत्रण असल्यामुळे आम्ही तिथे आलो होतो; परंतु मढवी यांनी मुद्दाम गोंधळ घातला व अपशब्द वापरले. वाद वाढू नये, यासाठी कार्यक्रमातून जाण्याचा प्रयत्न केला असता, रॉड व कैचीने हल्ला करण्यात आला.

अंगरक्षकांनी हल्लेखोरांना अडविले. गाडीत बसल्यानंतर हल्लेखोरांनी कारच्या काचा फोडल्या असून, त्यांच्याविरोधात रीतसर गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी आरोपींना तत्काळ अटक केली नाही तर सनदशीर मार्गाने लढा दिला जाईल, असा इशाराही दिला. महापौर जयवंत सुतार यांनीही मढवी यांच्यावर आरोप केले आहेत. गोंधळ होण्याची शक्यता असल्याने बंदोबस्ताची मागणी केल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. पत्रकार परिषदेमध्ये माजी खासदार संजीव नाईक, जिल्हाध्यक्ष अनंत सुतार उपस्थित होते.

शिवसेनेनेही पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीवर आरोप केले आहेत. एम. के. मढवी यांनी आमदार संदीप नाईक, अनंत सुतार व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवरही गंभीर आरोप केले आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विनया मढवी यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप केला असून, याविषयी लेखी तक्रार केली आहे. वैभव नाईक यांनीही कार्यक्रम स्थळी येऊन शिवीगाळ केली व बंदूक दाखवून मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. खासदार राजन विचारे यांनीही, राष्ट्रवादीने खोटे गुन्हे दाखल केले आहेत, राष्ट्रवादी विकासकामांमध्ये अडथळे निर्माण करत आहे. यापूर्वी रुग्णालयासाठी खासदारनिधी देऊनही त्याचा वापर केला नाही. शिवसेना नगरसेवकांच्या प्रभागामध्ये वास्तू बांधून झाल्यानंतरही त्यांची उद्घाटने घेतली जात नसल्याचा आरोपही केला आहे. पत्रकार परिषदेमध्ये जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, द्वारकानाथ भोईर, विनया मढवी आदी. उपस्थित होते.खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हाराष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईक यांच्या तक्रारीवरून शिवसेना नगरसेवक एम. के. मढवी, विनया मढवी, करण मढवी, कुणाल म्हात्रे, अजय म्हात्रे, राजा यादव, अनिल मोरे, ऋषभ उपाध्याय, मढवी यांचा दुसरा चालक व इतरांविरोधात खुनाचा प्रयत्न, मारामारीच्या कलमाखाली गुन्हा दाखल झाला. आरोपींना अटक करण्याची मागणी करण्यात आली.शिवसेनेने केलेली तक्रारशिवसेनेने राष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईक, अनंत सुतार व इतर पदाधिकाऱ्यांच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. या सर्वांनी धक्काबुक्की केली व विनया मढवी यांचा विनयभंग केल्याचा गंभीर आरोप केला आहे. वैभव नाईक यांनी कार्यक्रमस्थळी येऊन शिवीगाळ केली. पिस्तूल दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही केला.

काँग्रेसनेही केला निषेधआमदार व उपमहापौरांसह इतरांना धक्काबुक्की झाल्याचा काँगे्रसनेही निषेध केला आहे. उपमहापौर मंदाकिनी रमाकांत म्हात्रे यांनीही या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली. शिवसेनेच्या संबंधित नगरसेवकांची पार्श्वभूमी सर्वांना माहिती असून त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा काय करणार, या प्रकरणी कडक कारवाईची मागणीही केली आहे.

दुकाने बंद करण्याचा प्रयत्नराष्ट्रवादीच्या आमदारांची गाडी फोडल्याचे वृत्त समजल्यानंतर ऐरोली व कोपरखैरणे परिसरातील दुकाने बंद करण्यात आली होती. या हल्ल्याचा निषेध करण्यात आला. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बंद न करण्याचे आवाहन केल्यानंतर दुकाने पुन्हा सुरू करण्यात आली.दहा वर्षांनंतर पुन्हा राडेबाजीऐरोली हा यापूर्वी संवेदनशील विभाग म्हणून ओळखला जात होता. यापूर्वी चार नगरसेवकांचे व अनेक राजकीय पदाधिकाºयांचे खून या परिसरामध्ये झाले आहेत. २००८ पासून या परिसरामधील राडेबाजी कमी झाली होती. नागरिकांनाही दिलासा मिळाला होता. शिवसेना व राष्ट्रवादीमधील राडेबाजीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पुन्हा राडेबाजी सुरू होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.उद्घाटनांवरून तिसºयांदा राडानवी मुंबईमध्ये उद्घाटन व नामफलकांच्या अनावरणावरून यापूर्वीही गोंधळ झाला आहे. ३० एप्रिल २००६ मध्ये सीबीडीमधील राजीव गांधी मैदानाच्या बाजूला असलेल्या सभामंडपाच्या उद्घाटनास तत्कालीन विधानपरिषद सदस्या मंदा म्हात्रे यांना बोलावण्यात आले नाही, यामुळे तत्कालीन मंत्री गणेश नाईक व म्हात्रे यांच्यात शाब्दिक चकमक झाली होती. यानंतर मे २०१४ मध्ये दिवाळे जेट्टीच्या उद्घाटनाचा आमदार मंदा म्हात्रे यांच्या नावाचा फलक काढण्यात आला, यामुळे नाईक व म्हात्रे यांच्यात वाद झाला होता. यानंतर आता पुन्हा ऐरोलीमध्ये राष्ट्रवादी व शिवसेनेमध्ये उद्घाटनाच्या श्रेयावरून वाद झाला असून नवी मुंबईमध्ये पुन्हा श्रेयवादाचे राजकारण सुरू झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे.