- वैभव गायकर ।लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराने सर्वत्र जोर पकडला आहे. राज्यातील मावळ लोकसभा मतदारसंघ सध्याच्या सर्वात चर्चेत असणारा मतदारसंघ आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे येथून निवडणूक लढवत असल्याने महत्त्व जास्त आहे.
मावळमधील पनवेल विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदार आहेत. येथे माजी खासदार रामशेठ ठाकूर, तसेच आमदार प्रशांत ठाकूर यांचे वर्चस्व आहे. शरद पवार यांच्याशी सलोख्याचे संबंध असल्याने रामशेठ ठाकूर हे पार्थ पवार यांना अप्रत्यक्ष मदत करतील, अशी चर्चा होती. मात्र, युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या पाठीशी ठाकूर पितापुत्र ठामपणे उभे राहिल्याचे चित्र सध्या मतदारसंघात दिसत आहे. बारणेंच्या प्रचारात या दोघांनी आघाडी घेतल्याचे कारण, लोकसभेनंतर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका हे मानले जात आहे.
श्रीरंग बारणे यांना पनवेल विधानसभा क्षेत्रातून मतांच्या माध्यमातून फटका बसल्यास त्याचा परिणाम विधानसभेच्या निवडणुकीत प्रशांत ठाकूर यांना बसण्याची शक्यता आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकी वेळी सेनेने प्रशांत ठाकूर यांच्याविरोधात उमेदवार दिलेला होता. शेकाप, भाजप तसेच सेना अशी तिरंगी लढत या वेळी पाहायला मिळाली होती. आमदार प्रशांत ठाकूर यांनी निवडणुकीत विजय संपादित केला असला तरी ते केवळ १५ ते २० हजार मतांच्या फरकाने विजयी झाले होते. या वेळी दुसºया क्र मांकावर शेकाप तर तिसºया क्र मांकावर शिवसेनेने पनवेल तालुक्यातील आपले अस्तित्व दाखवून दिले होते. सेनेच्या उमेदवाराला या वेळी ३० हजारांच्या आसपास मते मिळाली होती. ही मते विधानसभेसाठी निर्णायक होऊ शकतात. लोकसभा निवडणुकीत भाजपने सहकार्य न केल्यास, सेनेकडून त्याचा वचपा विधानसभेच्या निवडणुकीत काढण्याची शक्यता आहे. हीच भीती कदाचित ठाकूर पितापुत्रांना असल्याने सध्या बारणेंच्या प्रचारात संपूर्ण पनवेल भाजपने सक्रिय सहभाग घेतल्याची चर्चा आहे. मध्यंतरी ठाकूर पितापुत्रांनी मुंबई येथे शरद पवार यांची भेट घेतल्याची चर्चा माध्यमांमध्ये होती. मात्र, लगेचच आमदार प्रशांत ठाकूर यांनी हे वृत्त फेटाळले आणि युतीचे उमेदवार असलेले श्रीरंग बारणे यांच्या विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असून पनवेल, उरणमधील राष्ट्रवादीच्या अस्तित्वावर प्रशांत ठाकूर यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले होते.मावळ लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा क्षेत्र आहेत. यात पिंपरी, चिंचवड, मावळ, पनवेल, उरण, कर्जत या मतदारसंघाचा आढावा घेतल्यास सेना-भाजपची ताकद जास्त वाटते. मात्र, पवार कुटुंबीयांचे या मतदारसंघातील सर्वपक्षीय नेत्यांचे संबंध पाहता, हे ऋ णानुबंध पार्थ पवार यांच्या पथ्यावर पडणार की काय, याबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत.
२०१४ साली असे होते चित्र२०१४ च्या विधानसभा निवडणुकी वेळी शिवसेनेने प्रशांत ठाकूर यांच्या विरोधात उमेदवार दिला होता. प्रशांत ठाकूर हे केवळ १५ ते २० हजार मतांनी विजयी झाले होते. शेकाप व शिवसेना अनुक्रमे दुसºया व तिसºया क्रमांकावर होते. सेनेच्या उमेदवाराला तेव्हा ३० हजारांच्या आसपास मते मिळाली होती.