बायोमेट्रिकमध्ये ठाणे जिल्हा दुसरा

By Admin | Published: August 16, 2015 11:49 PM2015-08-16T23:49:43+5:302015-08-16T23:49:43+5:30

बायोमेट्रिक पद्धतीने सुरू असलेल्या शिधापत्रिकाधारकांच्या नोंदणीत ग्रामीण ठाणे जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर सध्या स्थिरावला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात

Thane district second in biometrics | बायोमेट्रिकमध्ये ठाणे जिल्हा दुसरा

बायोमेट्रिकमध्ये ठाणे जिल्हा दुसरा

googlenewsNext

पंकज रोडेकर ठाणे
बायोमेट्रिक पद्धतीने सुरू असलेल्या शिधापत्रिकाधारकांच्या नोंदणीत ग्रामीण ठाणे जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर सध्या स्थिरावला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात जवळपास ७५ ते ८० टक्के नोंदणी पूर्ण झालेली आहे. ही आकडेवारी जिल्ह्यातील अवघ्या पाच तालुक्यांमधील असल्याची माहिती जिल्हा पुरवठा विभागाने दिली.
ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात शिधापत्रिकेवरील लोकसंख्याही ८ लाख ८५ हजार ८७३ इतकी आहे. त्या शिधापत्रिकेवरील धारकांची माहिती संगणकीकरणासाठी ठाणे जिल्हा पुरवठा विभागाने एकूण १ लाख ९४ हजार ५८० फॉर्मचे वाटप केले होते. त्यातील आतापर्यंत १ लाख ३५ हजार ५४७ फॉर्म संकलित करण्यात आले आहेत. याचबरोबर त्यांची आधारसिंडिंगची नोंदणी केली असून, ही संख्या दोन लाख ७२ हजार ९३६ इतकी आहे. पाच तालुक्यांमध्ये शहापूर तालुका आघाडीवर आहे. या तालुक्यात संकलित केलेल्या फॉर्म
आणि आधारसिंडिंंगची संख्या सर्वाधिक आहे.
बायोमेट्रिक झालेल्या नोंदणीच्या वेळेस ठाणे जिल्हा ३९ क्रमांकावर होता. ठाणे जिल्ह्याने प्रथम क्रमांकावर झेप घेतली होती. मात्र सध्या ठाणे दुसऱ्या क्रमांकावर आहे. या नोंदणीत राज्यात लातूर जिल्हा हा प्रथम क्रमांकावर असल्याची माहिती ठाणे जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. मोहन नळदकर यांनी ‘लोकमत’ला दिली.

Web Title: Thane district second in biometrics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.