कांदा-बटाटा व्यापाऱ्यांनी रोडवर थाटली दुकाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 12:41 AM2019-03-14T00:41:14+5:302019-03-14T00:41:28+5:30

एपीएमसीजवळील प्रकार; अतिक्रमण करणाऱ्यांकडे दुर्लक्ष

Thane shops on the road by onion and potato traders | कांदा-बटाटा व्यापाऱ्यांनी रोडवर थाटली दुकाने

कांदा-बटाटा व्यापाऱ्यांनी रोडवर थाटली दुकाने

Next

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी मार्केटजवळ रोडवर अनधिकृतपणे कांदा - बटाट्याचा व्यापार सुरू करण्यात आला आहे. यामुळे वाहतूककोंडी होत असून मार्केटमधील अधिकृत व्यापारावर परिणाम होत आहे. याविषयी तक्रारी करूनही महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

एपीएमसीने बिगरगाळाधारक भाजी व्यापाऱ्यांसाठी विस्तारित मार्केटची उभारणी केली आहे. मूळ मार्केटमधून विस्तारित मार्केटमध्ये जाण्यासाठी महापालिकेकडे पाठपुरावा करून डांबरी रोड तयार केला आहे. काही महिन्यांपासून या रोडवर कांदा व बटाट्याची विक्री करणाºया व्यापाºयांनी अतिक्रमण केले आहे. रोडच्या दोन्ही बाजूला शेकडो गोणी उतरवून अनधिकृतपणे व्यापार केला जात आहे. त्यांच्या बाजूला इतर फेरीवाल्यांनीही जागा अडविली असून त्याचा परिणाम वाहतुकीवर होऊ लागला आहे. बाजार समितीने कांदा व्यापारासाठी स्वतंत्र मार्केटची उभारणी केली आहे. परंतु भाजी मार्केटच्या बाहेर सुरू असलेल्या व्यापारामुळे तेथील व्यापारावर परिणाम होऊ लागला आहे. रोडवर सुरू असलेला हा व्यापार थांबविण्यात यावा व संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी दक्ष नागरिकांनी व बाजार समितीमधील अधिकृत व्यापाºयांनी केली होती. घाऊक भाजीपाला व्यापारी महासंघानेही एपीएमसी पोलीस स्टेशन, बाजार समिती प्रशासनासह महानगरपालिकेच्या तुर्भे विभाग अधिकाºयांना याविषयी वारंवार पत्र दिले आहे. पण अद्याप संबंधितांवर ठोस कारवाई झालेली नाही.

बाजार समिती परिसरामध्ये अनधिकृत फेरीवाल्यांची संख्याही वाढू लागली आहे. पदपथ व रोडवर जिथे जागा मिळेल तेथे अतिक्रमण करण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. महापालिका प्रशासनाने कडक कारवाई करावी, अशी मागणी व्यापाºयांनी केली आहे. विस्तारित मार्केटच्या परिसरामध्ये फेरीवाले येऊ नयेत यासाठी गेट बांधावे, अशी मागणीही केली आहे.

भाजी मार्केट व विस्तारित मार्केटच्या मध्ये रोडवर कांदा-बटाट्याचा व्यापार सुरू आहे. त्यांच्यावर पालिकेने कारवाई करावी. येथे पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी रोडवर गेट तयार करावे व बाजार समितीने तेथे सुरक्षारक्षकाची नेमणूक करावी.
- शंकर पिंगळे,
व्यापारी प्रतिनिधी, भाजी मार्केट

Web Title: Thane shops on the road by onion and potato traders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.