ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. १८ - ठाणे - वाशी मार्गावर पारसिकजवळ रेल्वेच्या दुरुस्ती वाहनातच बिघाड झाल्याने या मार्गावरील दोन्ही दिशेकडील वाहतूक ठप्प पडली. यामुळे सकाळी ऑफीसला जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांचे अतोनात हाल झाले आहेत. तब्बल चार तासानंतर या मार्गावरील रेल्वे सेवा सुरु करण्यात यश आले आहे.
ठाणे - वाशी ट्रान्सहार्बर महामार्गावर गुरुवारी सकाळी रेल्वेचे दुरुस्ती वाहन बिघडले. यामुळे ठाणे व वाशी या दोन्ही दिशेकडे जाणा-या लोकल गाड्यांची वाहतूक ठप्प पडली. ऐन सकाळी लोकल बंद पडल्याने ठाणे व वाशी स्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढली आहे. या मार्गावरील प्रवाशांना त्याच तिकीट किंवा पासवर कुर्लामार्गे हार्बर मार्गावर प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. याशिवाय नेरुळ - पनवेल दरम्यान विशेष शटल सेवाही सुरु केल्याचे ट्विट मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी केले आहे.
सकाळी दहाच्या सुमारास दुरुस्ती वाहन रुळावरुन बाजूला काढण्यात यश आल्याने प्रवाशांना सुटकेचा श्वास घेतला. आता दोन्ही दिशेकडील लोकल गाड्या सुरु झाल्या आहेत.