किलर बोर्डमुळे होणारे फ्लेमिंगोंचे मृत्युसत्र थांबता-थांबेना
By नारायण जाधव | Published: February 17, 2024 10:31 AM2024-02-17T10:31:38+5:302024-02-17T10:31:49+5:30
काही दिवसांपूर्वीच याच ठिकाणी सुचनाफलक अर्थात बोर्डला धडकून ४ फ्लेमिंगो दगावले होते.
नवी मुंबई : नवी मुंबई ते मुंबई जलवाहतुकीसाठी सिडकोने बांधलेल्या नेरूळ जेट्टीवर किलर बोर्डामुळे 3 फ्लेमिंगोचा मृत्यू झाल्याचे पुन्हा एकदा उघड झाले. आहे. गेल्या 2 वर्षातील ही तिसरी घटना असल्याने नवी मुंबई पर्यावरण वाचवा चळवळतील विविध संघटनांच्या सदस्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
काही दिवसांपूर्वीच याच ठिकाणी सुचनाफलक अर्थात बोर्डला धडकून ४ फ्लेमिंगो दगावले होते. त्यावेळी ॲडव्होकेट प्रदीप पाटोळे, सुनील अग्रवाल आदींनी चिंता व्यक्त करून हा बोर्ड काढण्याची मागणी सिडकोकडे केली होती. आता पुन्हा सिडकोचे सरव्यवस्थापकिय संचालक कैलाश शिंदे यांनी सेव्ह नवी मुंबई एन्व्हायर्नमेंट ग्रुपच्या श्रुती अग्रवाल यांना लवकरच बोर्ड हटवण्यात येईल असे आश्वासन दिले आहे. ते लवकरात लवकर अमलांत आणण्याची मागणी होत आहे