ओबीसी समाजाच्या हितासाठी रस्त्यावर उतरून लढा सुरूच राहील- छगन भुजबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 05:08 PM2022-09-19T17:08:19+5:302022-09-19T17:08:47+5:30

यावेळे माजी मंत्री छगन भुजबळ यांनी, देशात 54 टक्के ओबीसी समाज आहे. ओबीसीची जनगणना झाली पाहिजे.  देशात सर्वप्रथम मंडल आयोग शरद पवार यांनी स्वीकारला.

The fight will continue on the streets for the benefit of the OBC community says Chhagan Bhujbal | ओबीसी समाजाच्या हितासाठी रस्त्यावर उतरून लढा सुरूच राहील- छगन भुजबळ

ओबीसी समाजाच्या हितासाठी रस्त्यावर उतरून लढा सुरूच राहील- छगन भुजबळ

Next

नवी मुंबई : ओबीसी  समाजाच्या हिताचा लढा स्वातंत्र्यापासून सुरूच आहे. संपूर्ण 27 टक्के आरक्षण मिळालेच पाहिजे. यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. ते नवी मुंबईतील विष्णुदास भावे नाट्यगृहात आयोजित ओबीसी कृतज्ञता मेळाव्यात बोलत होते. 

यावेळे माजी मंत्री छगन भुजबळ यांनी, देशात 54 टक्के ओबीसी समाज आहे. ओबीसीची जनगणना झाली पाहिजे.  देशात सर्वप्रथम मंडल आयोग शरद पवार यांनी स्वीकारला. त्यांनी लढ्याला नेहमी पाठबळ दिले. मतभेद, पक्षभेद विसरून ओबीसीच्या प्रश्नासाठी सर्वांनी एकत्र यावे. रस्त्यावर उतरून लढा लढावा, असे आवाहन ही त्यांनी केले.

24 सप्टेंबर ला बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली पुणे भिडे वाढ्यावर सर्व महिला एकत्र येणार आहेत.  सावित्रीबाई नी सुरू केलेली शाळा पुन्हा सुरू करण्याची मागणी करणार आहेत. 26 तारखेला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये चळवळीतील लढवय्यांचा सत्कार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
 

Web Title: The fight will continue on the streets for the benefit of the OBC community says Chhagan Bhujbal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.