आंब्याच्या पहिल्या पेटीला १६ हजार रुपये भाव; मुहूर्ताच्या देवगड वाघोटनच्या केसरी आंब्याला पसंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 07:26 IST2025-01-07T07:26:27+5:302025-01-07T07:26:55+5:30

एका आंब्याला २६६ रुपये विक्रमी दर मिळाला.

The first box of mangoes costs Rs 16,000 as Kesari mango is preferred on Muhurt | आंब्याच्या पहिल्या पेटीला १६ हजार रुपये भाव; मुहूर्ताच्या देवगड वाघोटनच्या केसरी आंब्याला पसंती

आंब्याच्या पहिल्या पेटीला १६ हजार रुपये भाव; मुहूर्ताच्या देवगड वाघोटनच्या केसरी आंब्याला पसंती

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: देवगडमधील वाघोटन गावातून ५ डझन केसर आंब्याची पहिली पेटी बाजार समितीमध्ये दाखल झाली. १६ हजार रुपये दराने पेटीची विक्री झाली. एका आंब्याला २६६ रुपये विक्रमी दर मिळाला.

देवगडमधील शकील मुल्ला यांनी सोमवारी पाच डझन केसर आंबा विक्रीसाठी बाजार समितीमध्ये पाठविला आहे. मुहूर्ताचा आंबा खरेदीसाठी ग्राहकांनीही गर्दी केली होती. अखेर १६ हजार रुपये दराने पेटीची विक्री झाली. ३,२००  रुपये डझन असा दर मिळाला असून, एका आंब्याला २६६ रुपये मोजावे लागले आहेत. या वर्षी आंबा हंगामाला उशीर झाला आहे. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून नियमित आवक सुरू होणार आहे. 

या वर्षी दक्षिण आफ्रिकेचा मलावी हापूस व इतर दोन प्रकारचे आंबे विक्रीला आले होते. मंगळवारी अजूनही एक प्रकारचा आंबा बाजार समितीमध्ये विक्रीसाठी येणार असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

Read in English

Web Title: The first box of mangoes costs Rs 16,000 as Kesari mango is preferred on Muhurt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.