नवी मुंबई : नवी मुंबईतील भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांनी गेल्या महिन्यात वाशीच्या विष्णुदास भावे नाट्यगृहात जनता दरबार घेतला आहे. या जनसंवाद कार्यक्रमाच्या नावाखाली घेतलेल्या त्यांनी घेतलेल्या जनता दरबारास सिडको, महापालिका, महावितरण आणि पोलिस अधिकार्यांनी हजेरी लावली होती. यावरून राजकिय वादही पेटला होता. आता नाईक यांना टक्कर देण्यासाठी त्यांच्या पक्षांतर्गत विरोधक मानल्या जाणार्या बेलापूरच्या आमदार मंदाताई म्हात्रे याही मैदानात उरतल्या आहेत.
मंदा म्हात्रे याही नवी मुंबईतील नागरिकांच्या तसेच तरुण-तरुणींच्या आपापल्या विभागाचे काही प्रश्न किंवा समस्या जाणून घेण्याकरिता “जनतेशी सुसंवाद”* या कार्यक्रमाद्वारे संवाद साधून नागरिकांचे प्रश्न व समस्या जाणून घेणार आहेत. याबाबत अधिक माहिती देतांना त्या म्हणाल्या की, ज्या काही आपल्या विभागातील कुठल्याही प्रकारचे प्रश्न किंवा समस्या ज्या काही असतील त्या “लेखी स्वरुपात” घेऊन याव्यात. त्यांचा हा सुसंवाद कार्यक्रम २९ ऑक्टोबर २०२३ रोजी संध्याकाळी चार वाजता वारकरी भवन, पहिला मजला, सेक्टर ३ ए, सीबीडी, बेलापूर येथे होणार आहे. या सुसंवाद कार्यक्रमात त्या कोणती भूमिका घेतात, कोणावर तोफ डागतात, याकडे नवी मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.