शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

जालना येथील घटनेची गृहमंत्र्यांनी सखोल चौकशी करावी, नरेंद्र पाटील यांची मागणी

By योगेश पिंगळे | Published: September 02, 2023 4:43 PM

Navi Mumbai: जालना येथील घटनेची गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी पाटील यांनी केली. यावेळी पोलीस प्रशासन आणि जालना जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.

 - योगेश पिंगळेनवी मुंबई -  मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील मागण्यासाठी जालना येथे आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केला. या घटनेचा निषेध म्हणून माथाडी नेते नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांच्या नेतृत्वात नवी मुंबईतील मराठा समाजाने शनिवारी वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध आंदोलन केले. यावेळी जालना येथील घटनेची गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी पाटील यांनी केली. यावेळी पोलीस प्रशासन आणि जालना जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.

मराठा समाजच्या आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यानी जालना येथे आंदोलन सुरु केले होते. पाटील यांची प्रकृती बिघडत होती मात्र ते निर्णयावर ठाम होते. पोलीस यंत्रणा हे आंदोलन शांतपणे हाताळू शकले असते परंतु पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून कोणीतरी कट कारस्थान करून वातावरण चिघळविण्याचा प्रयत्न केला आणि आंदोलनकर्त्यांवर हल्ला झाल्याचा आरोप पाटील यांनी यावेळी केला. गृहमंत्री फडणवीस यांनी या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई कारवाई तसेच संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी पाटील यांनी केली. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे हि मागणी रास्त असून सुप्रीम कोर्टातून आरक्षण आणण्याची जबाबदारी राज्यकर्त्यांची असल्याचे पाटील यांनी सांगितले. यावेळी पोलीस प्रशासन, जालना जिल्हाधिकारी यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. आंदोलना दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे ठाणे जिल्हाध्यक्ष संतोष बर्गे, माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे संयुक्त सरचिटणीस चंद्रकांत पाटील, पोपटराव देशमुख, भाजप युवा मोर्चाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष दत्त घंगाळे, संतोष कोंढाळकर, जितू येवले, श्याम ढमाले, योगेश बर्गे, विजय पाटील, अरुण पवार, दिनकर सणस, सोमनाथ काटे, कृष्णा पाटील, बाजीराव धोंडे आदी उपस्थित होते. 

मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलनजालना येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या हल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी स्वराज्य संघटना महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष आणि मराठा युवा सेना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अंकुश कदम यांच्या नेतृत्वात मराठा क्रांती मोर्चा नवी मुंबई आणि स्वराज्य पक्ष नवी मुंबई यांच्या वतीने वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी मराठा आंदोलकांवर जालना येथे झालेल्या हल्याचा निषेध करण्यात आला.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसJalanaजालनाNavi Mumbaiनवी मुंबई