शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

न्यायव्यवस्थाच कायद्याच्या कचाट्यात, बनावट वारस दाखले, चलनाच्या घोटाळ्याने हादरले न्यायालय

By सूर्यकांत वाघमारे | Updated: January 23, 2025 06:14 IST

Crime News: वारस दाखले प्रक्रियेतल्या गतिरोधकांना सुवर्णसंधी समजून न्यायालयीन कारकुनाने शासनालाच कोट्यवधींचा चुना लावत न्यायालयातील त्रुटी चव्हाट्यावर आणल्या आहेत.

- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई - वारस दाखले प्रक्रियेतल्या गतिरोधकांना सुवर्णसंधी समजून न्यायालयीन कारकुनाने शासनालाच कोट्यवधींचा चुना लावत न्यायालयातील त्रुटी चव्हाट्यावर आणल्या आहेत. दीड महिन्यापासून पनवेल न्यायालयात सुरू असलेल्या तपासाच्या चक्रातून चार गुन्हे दाखल झाल्याने न्यायव्यवस्थाच भेदरली आहे. कारकूनने न्यायाधीशांच्या टायपिस्टच्या संगणकाच्या परस्पर वापरासह न्यायाधीशांचे बनावट शिक्के, सही वापरून बनावट चलनाद्वारे शेकडो बनावट वारस दाखले वाटप केले. तर सिडकोसह इतरही शासकीय संस्थांमध्ये या बनावट दाखल्यांमधून मोबदले लाटल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

वडिलोपार्जित जमिनींचा लाभ घेण्यासाठी, प्रकल्पाला दिलेल्या जमिनीच्या मोबदल्यासाठी, शासकीय लाभासाठी वारस दाखला आवश्यक आहे. त्यासाठी वर्षभर न्यायालयीन प्रक्रिया टाळण्यासाठी अर्जदारांकडून हात ओले करायचीही तयारी असते. त्यातूनच पनवेल न्यायालयात बनावट वारस दाखल्याच्या घोटाळ्याने जन्म घेतल्याचे समोर आलेल्या गुन्ह्यावरून दिसत आहे.

आजवरचे दाखलेही संशयाच्या घेऱ्यातदीपक फडमार्फत पनवेल न्यायालयातून आजवर देण्यात आलेले वारस दाखले संशयाच्या घेऱ्यात आले आहेत. या दाखल्यांचा वापर करून सिडकोसह इतर शासकीय संस्थांकडून संबंधितांनी लाभ मिळवल्याची देखील शक्यता आहे.

ऑनलाइन प्रक्रियेतला मोठा घोटाळान्यायालयीन दाव्यांचे शुल्क आकारणीची ई-चलन प्रक्रिया अंमलात आहे. कारकूनमार्फत शुल्क आकारल्यानंतर ऑनलाइन चलन काढले जाते. हे चलन दाव्यासोबत न्यायालयात जमा केले जाते.पुढे या चलनाची ऑनलाइन पडताळणी करून दावा दाखल केला जातो, परंतु चलन देणे व पडताळणी दोन्ही कामे एकाच व्यक्तीमार्फत झाल्याने हा घोटाळा दडपला गेला. या प्रकरणात दोन वकीलही अटकेत असून, इतरांवरही अटकेची टांगती तलवार आहे.पनवेल न्यायालयातून सुरू झालेल्या या घोटाळ्याचे कनेक्शन उरण न्यायालयातदेखील पोहोचले आहे. त्यामुळे चलन घोटाळ्याची व्याप्ती राज्यभरातील इतरही न्यायालयांमध्ये पसरल्याची शक्यता नाकारता येत नाही.

...आणि प्रकार चव्हाट्यावरबनावट दाखल्याचा एक प्रकार न्यायाधीशांच्या निदर्शनात आल्यानंतर त्यांच्या तक्रारीवरून पोलिस फडसह दोन वकिलांपर्यंत पोहोचले. दावा दाखल करण्याचे शुल्क आकारल्यानंतर संबंधितांना बनावट चलन दिले जायचे. या चलनाची पडताळणी देखील फड करत असल्याने पुढच्या प्रक्रियेतही अडथळा नव्हता. मात्र, त्याने दिलेला दाखला सिडकोने फेटाळल्याने संपूर्ण प्रकार चव्हाट्यावर आला.

टॅग्स :Courtन्यायालयNavi Mumbaiनवी मुंबई