मुंबई-पुणे महामार्गाचा मुख्य रस्ता वाहतुकीस बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2023 09:14 PM2023-02-11T21:14:17+5:302023-02-11T21:40:33+5:30
ही वाहतूक कळंबोली गाव ते पनवेल सर्कल ते देवांश ईन हॉटेल जवळून पनवेल रॅम्प पासून पुन्हा हुतगती मार्गे पुणेकडे अशी वळविण्यात येणार आहे.या कालावधीत द्रुतगती मार्गावरील वाहनांनी वरील पर्यायी मार्गाचा उपयोग करावा.
पनवेल : मुंबई- पुणे द्रुतगती मार्गाच्या पुणेकडे जाणा-या कळंबोली गावाजवळ ओव्हर हेड गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत करण्याचे असलेने या वाहिनीवरील वाहतूक दि. १२ रोजी दुपारी १२ ते दुपारी ३ या कालावधीत पुर्णपणे बंद करण्यात येणार आहे.
ही वाहतूक कळंबोली गाव ते पनवेल सर्कल ते देवांश ईन हॉटेल जवळून पनवेल रॅम्प पासून पुन्हा हुतगती मार्गे पुणेकडे अशी वळविण्यात येणार आहे. या कालावधीत द्रुतगती मार्गावरील वाहनांनी वरील पर्यायी मार्गाचा उपयोग करावा.
तसेच, वरील कालावधी दरम्यान द्रुतगती मार्गावरील वाहनचालकांना काही अडचण असल्यास त्यांनी मदतीसाठी मुंबई- पुणे द्रुतगती मार्गाच्या नियंत्रण कक्षाच्या दूरध्वनी ९८२२४९८२२४ या क्रमांकावर किंवा महामार्ग पोलीस विभागाच्या ९८३३४९८३३४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे अवाहन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्या मार्फत करण्यात आले आहे.