एक लाख रोजगार देणाऱ्या जेम्स ॲण्ड ज्वेलरी पार्कचे पुढचे पाऊल; पर्यावरण दाखल्यासाठी केला अर्ज

By नारायण जाधव | Published: February 27, 2023 08:16 PM2023-02-27T20:16:06+5:302023-02-27T20:17:03+5:30

मौल्यवान रत्ने आणि आभूषणांच्या क्षेत्रातील जगातील सर्वात मोठे जेम्स ॲण्ड ज्वेलरी पार्क नवी मुंबईतील महापे एमआयडीसीत आकार घेत आहे.

The next step of Gems and Jewelery Park which provides 1 lakh employment | एक लाख रोजगार देणाऱ्या जेम्स ॲण्ड ज्वेलरी पार्कचे पुढचे पाऊल; पर्यावरण दाखल्यासाठी केला अर्ज

एक लाख रोजगार देणाऱ्या जेम्स ॲण्ड ज्वेलरी पार्कचे पुढचे पाऊल; पर्यावरण दाखल्यासाठी केला अर्ज

googlenewsNext

नवी मुंबई : मौल्यवान रत्ने आणि आभूषणांच्या क्षेत्रातील जगातील सर्वात मोठे जेम्स ॲण्ड ज्वेलरी पार्क नवी मुंबईतील महापे एमआयडीसीत आकार घेत आहे. २१.३ एकर क्षेत्रावर हे पार्क पहिल्या टप्प्यात विकसित करण्यात येत आहे. या पार्कच्या उभारणीसाठी अत्यावश्यक असलेल्या पर्यावरण विभागच्या ना हरकत दाखल्यासाठी इंडिया ज्वेलरी पार्कचे उपसंचालक जितेंद्र घोलप यांनी २३ फेब्रुवारी २०२३ रोजी पर्यावरण मंत्रालयाच्या परिवेश समितीकडे अर्ज केला आहे.


या पार्कसाठीचा भूखंड ताब्यात घेण्यासाठीचा एमआयडीसीसोबतचा करार जानेवारी २०२२ मध्ये झाला होता. त्यानंतर आता वर्षभरानंतर इंडिया ज्वेलरी पार्क, या संघटनेने परिवेश समितीकडे पर्यावरण दाखला मागितला आहे. या प्रकल्पामध्ये परिसरातील कामगारांसाठी कमी किमतीच्या निवासी सुविधा विकसित करून त्यांना प्रशिक्षण आणि उच्च कौशल्ये प्रदान करण्यात येणार आहेत. यामुळे कुशल कारागीर निर्माण होण्यास मदत होणार आहे.


आभूषणे बनविणारी १००० युनिट
महापे एमआयडीसीतील इलेक्ट्राॅनिक झोनमधील भूखंड क्रमांक ईएल २३७ वर पहिल्या टप्प्यात २१.३ एकर भूखंडावर हे पार्क आकार घेणार आहे. त्या ठिकाणी २० हजार कोटींहून अधिक गुंतवणूक आणि सुमारे एक लाख लोकांना रोजगार निर्माण होईल, असे सांगण्यात येत आहे. जगातील अत्यंत आधुनिक मशिनरींनी युक्त असे हे पार्क राहणार असून त्या ठिकाणी रत्ने आणि आभूषणे बनविणारी १००० युनिट पहिल्या टप्प्यात कार्यान्वित करण्यात येणार आहेत.


असे असेल पार्क
ए ब्लॉक - १४ माळ्यांच्या ९ इमारती राहणार असून त्या एकमेकांना जोडलेल्या राहणार आहेत. या इमारती मोठ्या कारखान्यांसाठी असतील. या ठिकाणी २६७२ ते ५२७३ चौरस फुटांचे गाळे राहणार आहेत. अशा प्रकारे येथे २३ लाख चौरस फूट कार्पेट एरिया असेल, असे संघटनेने आपल्या ब्रोशरमध्ये म्हटले आहे. 


बी ब्लॉक - ही इमारत छोट्या कारखान्यांसाठी राहणार असून ती नऊ माळ्यांची असणार आहे. येथे ४१३ ते ६२१ चौरस फुटांचे गाळे असतील. येथे तीन लाख चौरस फुटांच्या वर जागा मिळेल, असे अपेक्षित धरण्यात आले आहे.


 दरवर्षी ४० टन सोन्याची बचत
जानेवारी २०२२ मध्ये हा भूखंड ताब्यात घेतला त्यावेळी जीजेईपीसीचे (जेम्स ॲण्ड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल) उपाध्यक्ष विपुल शाह यांनी सांगितले होते की, अत्याधुनिक यंत्रसामग्री आणि पायाभूत सुविधांअभावी सोन्याच्या नुकसानीचे जे प्रमाण १० आहे, ते या पार्कच्या उभारणीनंतर ३ टक्क्यांपर्यंत कमी होण्यास मदत होणार आहे. सोन्याची धूळ ही अत्याधुनिक सक्शन आणि ड्रेनेज सिस्टीमद्वारे सहज मिळवता येणार आहे. यामुळे दरवर्षी ४० टन सोन्याची बचत होऊ शकते.” यावरून नवी मुंबईतील हे जेम्स ॲण्ड ज्वेलरी पार्क किती महत्त्वाचे आहे, याची कल्पना येऊ शकते.

 

 

 

 

Web Title: The next step of Gems and Jewelery Park which provides 1 lakh employment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.